ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ सध्या सुरू असलेल्या चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आहे. परंतु ऑस्ट्रेलिया संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी यांनी स्टीव्ह स्मिथ बद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
स्टीव्ह पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या चार डावात फक्त 10 धावा करू शकला आहे. त्याला भारतीय फिरकीपटू आर आश्विन आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्या विरुद्ध फलंदाजी करताना अडचणीचा सामना करावा लागला आहे. परंतु, ऑस्ट्रेलिया संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी यावर बोलताना म्हणाले, स्टीव्ह स्मिथ मोठी खेळी करण्याच्या खूप जवळ आहे.
टॉम मूडी आपला देशवासी असलेल्या स्टीव्ह स्मिथचे समर्थन करताना म्हणाले, “स्मिथ पिंजर्यातील वाघ आहे, जो कधीही हल्ला करण्यासाठी तयार आहे. तो मोठी खेळी करण्यासाठी तयार आहे. आपल्या विकेटचे मूल्य त्याला माहित आहे. सध्या धावा करण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त कोणी आसुसलेला नसेल.”
टॉम मूडी ईएसपीएन क्रिकइन्फो सोबत बोलताना म्हणाले, “आपल्याला त्याचे विक्रम बघायला हवे. तो मोठी खेळी करण्याच्या जवळ आहे. यामुळे चांगल्या कामगिरीची हमी मिळत नाही, परंतु यावरुन दिसून येते की, पिंजर्यात वाघ बंद आहे आणि हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे नवीन वर्षात धावा काढण्यासाठी याच्यापेक्षा जास्त काय हवे.”
टॉम मूडी म्हणाला, “केन, विराट आणि स्मिथ यांच्याबद्दल नेहमी चर्चा होती. त्यामुळे तो सुद्धा या चर्चेचा नेहमी भाग होण्यासाठी आसुसलेला आहे. तो पुन्हा हे निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. ”
स्टीव्ह स्मिथची कसोटीतील कामगिरी
स्टीव्ह स्मिथने 75 कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामधे त्याने 135 डावात फलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत 13136 चेंडूचा सामना करताना 7237 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च खेळी 239 धावांची आहे. त्याने या धावा 61.33 च्या सरासरीने काढल्या आहेत. ज्यामधे त्याचा स्ट्राईक रेट 55.09 चा राहिला आहे.
तसेच त्याच्या कसोटी कारकिर्दीत 26 शतकांचा आणि 29 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यापैकी 17 डावात नाबाद राहिला आहे. यादरम्यान त्याने 42 षटकार आणि 799 चौकार ठोकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
स्मिथची तयारी जोरात! हॉटेलरुममध्ये चक्क जर्सी घालून करतोय फलंदाजीचा सराव
सिडनीच्या मैदानावर तब्बल ६ वर्षांनंतर वॉर्नरने केली ‘अशी’ कामगिरी
आनंदाची बातमी! सौरव गांगुलीला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज; घरी परतताना दिली ‘ही’ प्रतिक्रिया