ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना शनिवारपासून (26 डिसेंबर) सुरु होणार आहे. असे असले तरी सध्या दोन्ही संघांना खेळाडूंच्या दुखापतींनी त्रस्त केले आहे. त्यात आता ऑस्ट्रेलियाची चिंता आणखी वाढली आहे. कारण ऑस्ट्रिलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या दुसऱ्या कसोटीतील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्मिथ दुसर्या कसोटी सामन्यासाठी पूर्णपणे फिट नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ स्टीव्ह स्मिथच्या फिटनेसबद्दल चिंतेत आहे. स्टीव्ह स्मिथला पाठीच्या दुखापतीचा त्रास होत आहे. परंतु या 31 वर्षीय स्टार फलंदाजाने आपण दुसर्या कसोटी सामन्यापूर्वी फिट होऊ, अशी आशा व्यक्त केली आहे.
स्टीव्ह स्मिथ म्हणाला, तो पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे आणि एक वेळेस असे वाटले होते की, ऍडलेड येथे झालेल्या कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नाही. परंतु तो पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी पात्र ठरला होता. त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मी या स्थितीत जास्त दिवस राहू शकत नाही. मी जेव्हा उभा राहतो आणि हालचाल करतो, तेव्हा त्रास होत नाही. परंतु जेव्हा बसतो तेव्हा त्रास जाणवतो. मला विश्वास आहे की, मी दुसर्या कसोटीसाठी फिट होईल.”
जर हा ऑस्ट्रेलियन फलंदाज मेलबर्न येथे होणाऱ्या कसोटी सामन्याला उपलब्ध झाला नाही, तर ही परिस्थिती भारतीय संघासाठी थोडी दिलासादायक ठरेल. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेविड वॉर्नरच्याही या सामन्यात खेळण्याबाबत संभ्रम आहे. तो भारताविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता.
मेलबर्नमध्ये स्मिथची कामगिरी चांगली राहिली आहे. या ठिकाणी त्याने 63 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळे तो या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत खेळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी तो कसून मेहनत घेत आहे. भारतीय संघ या 4 सामन्याच्या मालिकेत 0-1 या फरकाने पिछाडीवर आहे.
भारताकडूनसुद्धा या सामन्यासाठी विराट कोहली पालकत्व रजा घेतल्याने उपलब्ध नसेल. तसेच मोहम्मद शमी देखील दुखापतीमुळे खेळणार नाही.
डेविड वॉर्नर आणि विराट कोहली या कारणामुळे आहेत बाहेर
डेविड वॉर्नरला भारताविरुद्ध दुसर्या वनडेत क्षेत्ररक्षण करताना मांडीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने टी-20 मालिका आणि पहिल्या कसोटी सामन्यात सहभाग घेतला नव्हता. मात्र विराट कोहलीला कोणतीही दुखापत झाली नाही. तो पालकत्व रजेवर असून. तो भारतात परतला आहे. त्यामुळे तो दुसर्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ दिग्गज खेळाडूशिवाय पाकिस्तान खेळणार न्यूझीलंड विरुद्ध कसोटी सामना
भन्नाटच! न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूने घेतला अचंबित करणारा एकहाती झेल; व्हिडिओ व्हायरल
जामीनानंतर रैनाने दिले अटकेबाबत स्पष्टीकरण; सांगितली संपूर्ण घटना