भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला 8 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. मात्र या सामन्यातील अजिंक्य रहाणेचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंचा सहभाग असल्याने भारताचे माजी खेळाडू सुनिल गावसकर खुश झाले आहेत.
भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनिल गावसकर यांचे म्हणणे आहे की, ज्या प्रकारे ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूंनी प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेचे कौतुक केले. या गोष्टीने ते आनंदीत झाले आहेत. भारतीय संघाने मेलबर्न येथे कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी केली आहे.
सुनिल गावसकर यांनी ‘इंडिया टुडे’ सोबत बोलताना म्हणाले, “ज्या प्रकारे तो (अजिंक्य) संघाचे नेतृत्व करत होता, त्यासाठी त्याचे जे कौतुक होत होते, हे समजण्यासाठी तुम्हाला ऑस्ट्रेलियन समालोचन कक्षाच्या आसपास असायला पाहिजे होते आणि यामध्ये काही ऑस्ट्रेलियन दिग्गज सुद्धा सहभागी होते. जे समालोचन कक्षात होते.”
गावसकर म्हणाले,” हे बघून यासाठी आनंद झाला की ते त्याच्या नेतृत्वाची स्तुती करत होते. यामध्ये रिकी पॉटिंग, एॅडम गिलख्रिस्ट, माइकल हसी, शेन वॉर्न यासारखे दिग्गज खेळाडू सहभागी होते. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचे कौतुक करत होते. ”
परंतु गावसकर यांनी हे स्पष्ट केले की, विराट कोहली भारतीय संघाचा नियमित कर्णधार आहे. तो सध्या पालकत्व रजेवर मायदेशात आहे. त्याने परत आल्यावर ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
गावसकर म्हणाले, “अजिंक्य रहाणे हा प्रभारी कर्णधार आहे. एक प्रभारी कर्णधार किंवा प्रभारी फलंदाज किंवा नवीन चेंडूचा फिरकीपटू तोपर्यंत सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करतात, जोपर्यंत मुख्य खेळाडू परत नाही येत. मात्र तो परत आला की त्याला त्याची जागा द्यावी लागते.” गावसकर यांना विचारण्यात आले की, ऑस्ट्रेलिया संघावर दबाव असेल का, त्यावर ते म्हणाले, “निश्चित असेल. त्यांना अशा प्रकारच्या स्थितीचा अंदाज नाही. जेव्हा ही ते पहिला सामना जिंकता तेव्हा मालिका जिंकतात. काही माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू 4-0 बाबत बोलत होते. आता तुम्हाला माहित झाले आहे की हा संघ कसा आहे. हा असा संघ नाही जो स्वतःवर वर्चस्व निर्माण करण्याची संधी देईल.”
या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी पासून सुरू होईल. या सामन्यात भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज रोहित शर्मा भारतीय संघात सहभागी असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाची फलंदाजी अधिक मजबूत होईल.
महत्वाच्या बातम्या:
– डेविड वॉर्नरचे पुनरागमन! असा आहे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ
– अटीतटीच्या बॉक्सिंग डे कसोटीत न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
– गंभीर पाठोपाठ आता या भारतीय क्रिकेटपटूनेही केला भाजपात प्रवेश