मेलबर्न। 26 डिसेंबरपासून आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत.
भारताने पहिल्या सामन्यात 31 धावांनी विजय मिळवत मालिकेला उत्तम सुरूवात केली होती. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात 146 धावांनी पराभूत व्हावे लागले. या मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी भारतीय संघानी आज (23 डिसेंबर) कसून सराव केला.
या सरावामध्ये पुगरागमन केलेला अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि मंयक अगरवाल या दोघांनीही चांगलाच सराव केला. बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर हॅंडलवरून खेळाडूंचे सराव करतानाचे फोटो शेयर केले आहे.
Snapshots from #TeamIndia's training session at the MCG 📸📸🇮🇳 #AUSvIND pic.twitter.com/kgnei1OsON
— BCCI (@BCCI) December 23, 2018
मंयकला पृथ्वी शॉच्या जागेवर संघात घेतले असून त्याच्या सोबत सलामीला कोण येणार यावर प्रश्नचिन्ह आहे. पंड्याही फिट असल्याने त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळणार की नाही यावर चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
तसेच आर अश्विन आणि रविंद्र जडेजा हे दोघेपण दुखापतीतून सावरत आहेत. तर दुसऱ्या कसोटीला मुकलेला रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीआधी पूर्ण फिट झालेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–हार्दिक पंड्याने काढलेला टीम इंडियाचा सर्वोत्तम सेल्फी पाहिला का ?
–चक्क ७ वर्षांचा चिमुकला मेलबर्न कसोटीत असणार आॅस्ट्रेलियाचा कर्णधार
–टीम इंडियाचे हे दोन प्रमुख खेळाडू मेलबर्न कसोटीला मुकणार ?