अॅडलेड येथे 6 डिसेंबरला होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विरीट कोहलीला एक अनोखा विक्रम करण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियात त्याने 8 कसोटी सामने खेळताना 992 धावा केल्या असून त्याला 1000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 8 धावांची गरज आहे.
आतापर्यत ऑस्ट्रेलियात भारताकडून सचिन तेंडुलकर, व्ही व्ही एस लक्ष्मण आणि राहुल द्रविड या तिघांनीच कसोटीमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.
तसेच कोहलीला कर्णधार म्हणून खेळताना कसोटीमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यासाठी 13 धावांची गरज आहे. असा विक्रम आतापर्यत कोणत्याच भारतीय कर्णधाराला करता आला नाही.
कोहलीने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरुद्धही कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. यात त्याने दक्षिण आफ्रिके विरुद्ध एक शतक आणि एक अर्धशतक तर इंग्लंड विरुद्ध दोन शतके आणि तीन अर्धशतके केली होती.
आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या कोहलीने 2014-15च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये चार कसोटी सामने खेळताना 86.25च्या सरासरीने 692 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या चार शतकांचाही समावेश आहे. कोहलीच्या त्या उत्तम कामगिरीनंतरही भारताला ती मालिका 0-2 अशी गमवावी लागली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
–टीम इंडियाला आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोलाचा सल्ला…
–कसोटी मालिकेत आर अश्विन आहे टिम इंडियाचे महत्त्वाचे अस्त्र
–मेस्सी, रोनाल्डोला मागे टाकत लुका मोड्रिचने पटकावला ‘बॅलोन दी’ओर’ पुरस्कार