भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे शनिवारी (२६ डिसेंबर) खेळला जाणार आहे. या मालिकेत पहिल्या विजयासह यजमान संघ १-० ने आघाडीवर आहे. मेलबर्नमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्त्व अजिंक्य रहाणे करणार आहे. कारण नियमित कर्णधार विराट कोहली हा आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मासाठी पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार आहे. विराट आणि मोहम्मद शमी मालिकेतून बाहेर आहेत. तसेच पृथ्वी शॉ आणि वृद्धिमान साहाच्या खराब कामगिरीमुळे पुढील सामन्यात अनेक बदल होऊ शकतात. अशामध्ये भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफरने अनोख्या अंदाजात कर्णधार रहाणेला सिक्रेट मेसेज करत दोन खेळाडूंची संघात निवड करण्याचा सल्ला दिला आहे.
वसीम जाफरने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक ट्वीट केले. त्याने या ट्विटमध्ये अनेक इंग्रजी शब्द एका खाली एक लिहित म्हटले, “प्रिय अजिंक्य रहाणे, माझ्याकडे तुझ्यासाठी एक सिक्रेट मेसेज आहे. मी अपेक्षा करतो की, तू हा मेसेज डिकोड करशील. बॉक्सिंग डे कसोटीसाठी शुभेच्छा!”
Dear @ajinkyarahane88, here's a (hidden) message for you. Good luck for Boxing Day!
People
In
Cricket
Know
Grief
In
Life
Lingers
Aplenty
Never
Dabble
Rise
And
Handcraft
Unique
LegacyPS: you guys are open to have a go and decode the msg too 😉#INDvsAUS #AUSvIND
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) December 21, 2020
या ट्विटमध्ये जाफरने १६ इंग्रजी शब्दांचा वापर केला आहे. यातील पहिल्या ४ शब्दांची आद्याक्षरे मिळून PICK, पुढील ४ शब्दांची आद्याक्षरे मिळून GILL, त्यापुढील ३ शब्दांची आद्याक्षरे मिळून AND आणि शेवटच्या ५ शब्दांची आद्याक्षरे मिळून RAHUL असे तयार होते.
म्हणजेच जाफरने अजिंक्य रहाणेला सल्ला दिला आहे की, बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी त्याने शुबमन गिल आणि केएल राहुलची निवड केली पाहिजे.
क्रिकेट चाहत्यांना जाफरची ही पद्धत खूपच आवडली आहे. सोबतच याची प्रशंसादेखील करण्यात येत आहे. ऍडलेड कसोटीमध्ये अशी अपेक्षा केली जात होती की, गिलला शॉ ऐवजी संधी मिळेल. परंतु शॉला संधी देण्यात आली. यावेळी मिळालेल्या संधीचा शॉला फायदा घेता आला नाही. तो दोन्हीही डावात सपशेल फ्लॉप ठरला. त्याने पहिल्या डावात ० आणि दुसऱ्या डावात ४ धावाच केल्या. सोबतच संघाच्या इतर फलंदाजांच्या खराब फलंदाजीमुळे भारतीय संघाला हा सामना ८ विकेट्सने गमवावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; ‘या’ खेळाडूचे पुनरागमन
विराट भारतातून करणार संघाला मार्गदर्शन; कसं ते वाचा