भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना रंगला आहे. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ 173 धावांनी आघाडीवर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021-23चे विजेतेपद पटकावण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करत आहेत. लंडनमध्ये सुरू असलेल्या या अंतिम सामन्यात तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारतीय संघ सर्वबाद झाला.
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने 121.3 षटकांमध्ये 469 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाज देखील संयमी खेळ दाखवून हे लक्ष्य गाठतील, अशी अफेक्षा होती. अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकुर यांची खेली महत्वाची ठरली. पण संघातील प्रमुख फलंदाज मात्र पूर्ण पणे अपयशी ठरले. असे असले तरी, सामना आता कुठे रंगात आल्याचे दिसते.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने 5 बाद 151 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. खेळपट्टीवर अजिंक्य रहाणे आणि केएस भरत हे दोघे होते. रहाणेने 29*, भरत 5* धावांपासून पुढे खेळू लागले. रहाणेने 89 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. पण फरत मात्र दुसऱ्या दिवशी एकही धाव करू शकला नाही. तत्पूर्वी पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी रहाणेला रविंद्र जडेजा (48) याचीही चांगली साथ मिळाली होती. दुसऱ्या दिवशी राहणेच्या साथीने शार्दुल ठाकूर (51) देखील आपले अर्धशतक पूर्ण करू शकला.
रहाणे, जडेजा आणि शार्दुल हे तीन फलंदाज जरी महत्वाचे योगदान देऊ शकले असले, तरी पहिल्या चार फलंदाजांना चांगलीच निराशा केली. डब्ल्यूटीसी फायनलसारख्या महत्वाच्या सामन्यात सलामीला आलेली रोहित शर्मा आणि शुबमन गिल जोडी अनुक्रमे 15 आणि 13 धावा करून तंबूत परतली. तिसऱ्या क्रमांकावरील चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी अनुक्रमे 14-14 धावा केल्या. पहिल्याडावात ऑस्ट्रेलियन फलंदाजांप्रमाणेच गोलंदाज देखील जबरदस्त फॉर्ममध्ये होते. कर्णधार पॅट कमिन्स याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्क, स्कॉट बोलाँड आणि कॅमरून ग्रीन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. फिरकीपटून नाथन एलिस यालाही एक विकेट मिळाली. (India vs Australia WTC Final, Australia lead by 173 runs after first innings)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final: भारतीय खेळाडूंना ‘आई गं’ म्हणण्याची आली वेळ, ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा कहर
ट्रेविस हेडच्या दणदणीत शतकामागचं पाकिस्तान कनेक्शन आलं समोर, जाणून घ्या एका क्लिकवर