भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्याची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसर्या आणि चौथ्या सामन्यात भारतीय संघात स्थान दिली आहे. मात्र रोहित शर्मा चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात चूकीचा फटका खेळून बाद झाला. त्यामुळे चाहते सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त करत आहेत, यामध्ये बर्याच माजी खेळाडूंचा सुद्धा सहभाग आहे.
रोहित शर्माने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. त्याचबरोबर तो धावपट्टीवर चांगल्या प्रकारे सेट झाला होता. मात्र याचा रोहित शर्माला फायदा उचलता आला नाही. तो फिरकीपटू गोलंदाजाच्या फ्लाइट चेंडूवर आक्रमक फटका खेळताना फसला आणि बाद झाला. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. आपला 100 वा कसोटी सामना खेळत असलेला फिरकीपटू नॅथन लायन यांनी रोहित शर्मा बाद करण्यासाठी जाळे फेकले होते. त्यामध्ये भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज पूर्णपणे फसला आणि बाद झाला.
रोहित शर्मासाठी नॅथन लायनने डीप स्क्वेअरलेगवर आणि लाँगनवर क्षेत्ररक्षक उभा केला होता. त्यानुसार गोलंदाजी करताना त्याने रोहित शर्माला मोठा फटका खेळण्यासाठी फ्लाइट चेंडू टाकला आणि त्यावर रोहित शर्मा आक्रमक फटका खेळण्याच्या नादात चेंडूत हवेत मारून बसला. त्यामुळे लाँगनवर उभ्या असलेल्या मिचेल स्टार्कने उजव्या बाजूला धावत जाऊन हा झेल घेतला. यामुळे रोहित शर्माच्या एका चांगल्या खेळीचा अंत झाला.
त्याच्या या चुकीच्या फटका खेळण्याने चाहते नाराज झाले. त्यांनी सोशल मीडियावर जाहीरपणे नाराजी दर्शविली आहे त्याचबरोबर भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू संजय मांजरेकर, सुनील गावसकर आणि मिताली राज यांनी ट्विट करताना आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. तत्पूर्वी रोहित शर्माने 74 चेंडूचा सामना करताना 6 चौकार ठोकत 44 धावांची खेळी केली होती.
समालोचक संजय मांजरेकर यांनी आपली नाराजी दर्शविताना सोशल मीडियावर ट्विट करताना लिहिले आहे की, “संघात अनुभवाची कमी आहे आणि अशावेळी रोहित सारखा अनुभवी फलंदाजांकडून अशा प्रकारचा फटका खेळण्याचे काहीच कारण नव्हते.”
Considering the experience missing in the team, that shot from an experienced Rohit Sharma was inexcusable. #AUSvsIND
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) January 16, 2021
त्याचबरोबर भारतीय महिला संघाची खेळाडू मिताली राज, माजी खेळाडू आकाश चोप्रा यांनीही रोहित शर्माच्या या चुकीच्या फटका खेळण्यावर ट्विटर वरुन आपले मत मांडले आहे.
From WOW to HOW….. 😔 #Rohit #AusvInd
— Aakash Chopra (@cricketaakash) January 16, 2021
@ImRo45 🤦🏼♀️ .. you were timing so so well ..
— Mithali Raj (@M_Raj03) January 16, 2021
https://twitter.com/Akshays_Rohit45/status/1350318740492017665?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1350318740492017665%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Findia-tour-of-australia%2Findia-vs-austrlia-brisbane-test-that-shot-from-an-experienced-rohit-sharma-was-inexcusable-says-sanjay-manjrekar%2Farticleshow%2F80299006.cms
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या ३६९ धावांच्या प्रत्युतरात भारताने २६ षटकात २ बाद ६२ धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे चार सत्रांचाच खेळ होऊ शकला.