दिल्ली। रविवारपासून (3 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला आहे.
मात्र या सामन्याआधी दिल्लीतील प्रदुषणाबद्दल मोठी चर्चा झाली होती. दिल्लीतील प्रदुषण वाढल्यामुळे टी20 मालिकेसाठी भारतीय दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशच्या संघाला दिल्लीतील टी20 सामन्याआधी(T20I) तोंडाला मास्क बांधून सराव करावा लागला आहे.
तसेच या सामन्याआधी भारताचा फिरकीपटू आर अश्विननेही (R Ashwin) शनिवारी(2 नोव्हेंबर) दिल्ली प्रदुषणाबद्दल चिंता व्यक्त केली होती.
अश्विन नुकताच रांचीमध्ये झालेल्या देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया ‘अ’ संघाकडून खेळला. पण इंडिया अ संघाला त्यांच्या दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर रांचीतून चेन्नईला परत जाण्यासाठी अश्विन दिल्लीमध्ये आला होता.
त्यामुळे दिल्लीतील प्रदुषणाबद्दल अश्विनने ट्विट केले आहे की ‘दिल्लीतील हवा खरंच भीतीदायक आहे. या पृथ्वीतलावर आपण जी हवा ऑक्सिजन म्हणून घेतो ती मनुष्यासाठी मूलभूत गरज आहे. ही खरंच आपात्कालीन परिस्थिती आहे.’
https://twitter.com/ashwinravi99/status/1190454147276922880
दिल्लीतील प्रदुषणामुळे रविवारी भारत-बांगलादेश संघातील पहिला टी20 सामना रद्द होण्याचीही भीती होती. पंरतू हा सामना नियोजित वेळेत खेळवण्यात आला. या सामन्यात बांगलादेशने 7 विकेट्सने विजय मिळवला.
अश्विन या बांगलादेश विरुद्धच्या टी20 मालिकेत भारतीय संघाचा भाग नाही.





