भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल याने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या फलंदाजीचा दम दाखवून दिला. सामन्यात पहिल्या डावात 20 धावांवर तंबूत परतणाऱ्या गिलने दुसऱ्या डावात खणखणीत शतक झळकावले. हे त्याचे पहिले वहिले कसोटी शतक होते. त्याला पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्यासाठी तब्बल 3 वर्षांचा काळ वाट पाहावी लागली. त्याचे पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकाचे स्वप्न झिम्बाब्वेविरुद्ध पूर्ण झाले होते. त्यावेळी त्याने 130 धावा चोपल्या होत्या. आता त्याने बांगलादेशविरुद्ध कसोटीतील पहिले शतक झळकावले. शतकानंतर गिलच्या रिऍक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शतक झळकावल्यानंतर शुबमन गिल (Shubman Gill) याने जी रिऍक्शन दिली, ती सर्वांच्या पसंतीस पडत आहे. गिल त्या खेळाडूंपैकी नाही, जो शतकानंतर आक्रमक सेलिब्रेशन साजरे करतो. मैदानावर जरी तो फलंदाजी करताना आक्रमक असला, तरीही त्याने सेलिब्रेशन अत्यंत शांततेत केले. याचीच सध्या सर्वत्र प्रशंसा केली जात आहे.
शुबमन गिल याने फिरकीपटू मेहिदी हसन याच्या गोलंदाजीवर चौकार मारत कसोटी शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने त्याची बॅट ड्रेसिंग रूमच्या दिशेने उचलली आणि विराट कोहली (Virat Kohli) याच्यासारख्या दिग्गज खेळाडूंपुढे डोकं खाली करत आपल्या शतकाचे सेलिब्रेशन केले. ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या खेळाडूंनीही हसत आणि टाळ्या वाजवत शुबमन गिलचे धैर्य वाढवले.
Love you @ShubmanGill 😘 pic.twitter.com/XjfBSnmAEZ
— depressed gill fan (@ShubmanGillFan) December 16, 2022
Celebration by Shubman Gill after scoring his maiden Test hundred. pic.twitter.com/DMcb5vAPVW
— Johns. (@CricCrazyJohns) December 16, 2022
शुबमन गिल याने दुसऱ्या डावादरम्यान जबरदस्त शतक झळकावले होते. गिल फिरकी गोलंदाजीविरुद्ध चांगल्याप्रकारे खेळतो. मात्र, तो मेहिदी हसन आणि तैजुल इस्लामवर ज्याप्रकारे बरसला, ते प्रशंसनीय होते. गिलने त्याच्या डावात 3 षटकार आणि 10 चौकार मारले होते. त्याने 72.37च्या स्ट्राईक रेटने 110 धावा चोपल्या. पुढे तो मेहिदीला आणखी एक षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. गिलच्या शतकानंतर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यानेही त्याचे शतक पूर्ण केले. त्याने 130 चेंडूत 102 धावा केल्या. यामध्ये 13 चौकारांचा समावेश होता. पुजाराच्या शतकानंतर भारताने 2 विकेट्स गमावत 258 धावांवर डाव घोषित केला. तसेच, बांगलादेशला विजयासाठी 513 धावांचे आव्हान दिले.
गिलची कसोटी कारकीर्द
गिलच्या कसोटी कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 23 डावात फलंदाजी करताना 33.76च्या सरासरीने 709 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान 110 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. (india vs bangladesh 1st test shubman gill maiden test century celebration virat kohli kl rahul react see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकाच क्लिकवर जाणून घ्या आयपीएल 2023 लिलावाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे, वाचा सविस्तर
बापरे बाप! अवघ्या 15 धावांवर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला ‘हा’ संघ, 5 फलंदाज शून्यावर तंबूत