२२ नोव्हेंबरपासून कोलकाता येथे भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) संघात दुसरा कसोटी सामना पार पडणार आहे. हा कसोटी सामना ऐतिहासिक दिवस-रात्र सामना असणार आहे. या कसोटी सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येणार आहे.
या सामन्यामध्ये नाणेफेक पूर्वी सैन्याचे पॅराट्रूपर्स (Army paratroopers) भारत आणि बांगलादेश संघाच्या कर्णधारांना गुलाबी चेंडू देण्यासाठी आकाशातून खेळपट्टीवर उतरतील.
सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशांचे राष्ट्रगीतही वाजवणार आहेत. यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) या ईडन गार्डनमध्ये सामना सुरू होण्याआधी बेल वाजवतील.
“पॅराट्रूपर्स दोन गुलाबी चेंडूंनी खेळपट्टीवर उतरतील. आम्ही सैन्याच्या (ईस्टर्न कमांड) योजनांबद्दल चर्चा केली आहे,” असे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (Bengal Cricket Association) सचिव अविषेक डालमिया म्हणाले.
सामन्यातील 40 मिनिटांच्या लंच ब्रेकदरम्यान सौरव गांगुली (Sourav Ganguly), सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), राहुल द्रविड (Rahul Dravid), अनिल कुंबळे (Anil Kumble) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांचा ‘फॅब्युलस फाइव्ह’ दर्शविणारा एक टॉक शो आयोजित केला आहे.
या टाॅक शोमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाता येथे 2001 च्या कसोटीत मिळवलेल्या विजयाच्या आठवणींना उजाळा दिला जाईल.
“हा टाॅक शो मोठ्या पडद्यावर दाखवला जाईल. जेणेकरून, प्रेक्षकांना स्पष्टपणे ऐकू येईल,” असे आविषेक म्हणाले.
'कॅप्टनकूल' धोनीला मागे टाकत कर्णधार कोहली बनला असे करणारा पहिलाच भारतीय!
वाचा👉https://t.co/azWzNvsWTL👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #TeamIndia #ViratKohli— Maha Sports (@Maha_Sports) November 16, 2019
आयपीएल २०२०: कोणत्या संघाने कोणाला केले कायम आणि कोणाला दिला डच्चू, घ्या जाणून
वाचा👉 https://t.co/2tYLomvRnc👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #IPL2020— Maha Sports (@Maha_Sports) November 16, 2019