---Advertisement---

‘या’ वेळेला सुरु होणार भारताचा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना

On: गुरूवार, नोव्हेंबर 14, 2019 6:14 PM
---Advertisement---

22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान भारत आणि बांगलादेश यांच्यात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कोलकातामधील ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना दिवस-रात्री कसोटी सामना असणार आहे.

त्यामुळे हिवाळ्याच्या हंगामात दव लक्षात घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनने(कॅब) हा दिवस-रात्र कसोटी सामना दुपारी 1 वाजल्यापासून सुरु होईल. तसेच रात्री 8 पर्यंत हा सामना सुरु राहिल.

भारत आणि बांगलादेश संघांचा हा पहिलाच दिवस- रात्र कसोटी सामना असेल.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याबद्दल पुष्टी केली आहे आणि सांगितले की दिवसाचा खेळ रात्री आठ वाजता समाप्त करण्यात येईल. कारण त्यानंतर खेळ सुरू राहिल्यास कोलकातामध्ये दव पडल्याने समस्या निर्माण होऊ शकते.

दव पाहता बीसीसीआयने खेळाच्या परिस्थितीत बदल करण्याची सीएबीची विनंती मान्य केली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

त्यामुळे आता या सामन्याचा खेळ आता दुपारी एक वाजता सुरू होईल आणि पहिले सत्र तीन वाजता संपेल. दुसरे सत्र दुपारी 3:40 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 5:40 वाजता समाप्त होईल. शेवटचे सत्र सहा ते आठ वाजेपर्यत चालेल.

सामन्याला लवकर सुरुवात केल्यास दव पडण्याच्या समस्येचा सामना करण्यास मदत होईल, असे इडन गार्डन्सचे क्यूरेटर सुजान मुखर्जी म्हणाले.

या सामन्यासाठी तिकिटांची मागणीही वाढली आहे. कॅबने ट्वीट केले आहे की, “तिकिटाना मागणी येत असल्यामुळे भारताच्या पहिल्या दिवस-रात्री कसोटी सामन्याच्या पहिले तीन दिवस दररोज 50,000 प्रेक्षक सामना पाहतील.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---