भारत आणि बांग्लादेश यांच्यातील टी20 विश्वचषक 2024 चा सुपर-8 सामना शनिवारी (22 जून) अँटिग्वा येथे भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळला जाणार आहे. बांग्लादेशचा संघ अपसेट करण्यात माहीर आहे. त्याचबरोबर टीम इंडियामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शिवम दुबे आणि रवींद्र जडेजासारखे खेळाडू धावांसाठी झगडत आहेत. अशास्थितीत भारताला या सामन्यात बांग्लादेशविरुद्ध सावध राहावं लागेल.
जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघानं अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. बांग्लादेशचा संघ अफगाणिस्तानपेक्षा काही वेगळा नाही. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माला या सामन्यात आपले स्टार खेळाडू फॉर्ममध्ये परततील अशी आशा असेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना अद्याप या विश्वचषकात मोठी खेळी खेळता आलेली नाही. तर डावखुरा फलंदाज शिवम दुबेला फिरकीपटूंविरुद्ध षटकार मारण्यासाठी संघात घेतलं असूनही तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही.
शिवम दुबेला त्याच्या आयपीएलमधील फॉर्ममुळे भारतीय संघात स्थान देण्यात आलं. मात्र या विश्वचषकात त्याचा फॉर्म अद्याप दिसलेला नाही. शिवम दुबेनं अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात नाबाद 31 धावा केल्या, मात्र तो संपूर्ण खेळीदरम्यान संघर्ष करताना दिसला. जर तो पुन्हा अपयशी ठरला, तर संघ व्यवस्थापन संजू सॅमसनला संधी देण्याचा निर्णय घेऊ शकतं.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्फोटक अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बॅटिंग फॉर्ममध्ये परतला. ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे. या सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही पहिली संधी मिळाली, ज्याचं सोनं करत त्यानं शानदार गोलंदाजी केली.
दुसरीकडे, बांग्लादेशच्या फलंदाजांनी आतापर्यंत निराशा केली असून, त्यांना विश्वचषकातील आपल्या आशा कायम ठेवण्यासाठी कोणत्याही किंमतीत विजय मिळवावा लागेल. बांग्लादेशच्या संघात पॉवर हिटर्सची उणीव आहे. सलामीवीर लिटन दास आणि तनजीद खान यांच्या खराब फॉर्मनंही त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बांग्लादेशच्या फलंदाजांसमोर जसप्रीत बुमराहचा सामना करण्याचं मोठं आव्हान असेल, जो आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. बुमराहनं या विश्वचषकात 3.46 च्या इकॉनॉमी रेटनं गोलंदाजी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सुपर 8 सामन्यात बांग्लादेशचे हे 3 खेळाडू ठरू शकतात डोकेदुखी, टीम इंडियाला राहावं लागेल सावध
टी20 विश्वचषकात रवींद्र जडेजा बनलाय भारतीय संघाची कमजोरी, आकडेवारी धक्कादायक!
काय सांगता! गौतम गंभीरच्या आधी व्हीव्हीएस लक्ष्मण बनणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक?