भारताची बुधवार, 1 आॅगस्टपासून इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेच्या आधी भारतीय संघासमोर सलामीच्या जोडीचा प्रश्न आहे. भारतासाठी शिखर धवन, मुरली विजय आणि केएल राहुल असे पर्याय सलामीसाठी उपलब्ध आहेत.
याविषयी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपली मते मांडली आहेत. cricket.com.au ने दिलेल्या वृत्तानुसार गांगुली म्हणाला, “कसोटीत सलामीसाठी मी मुरली विजय आणि केएल राहुलला पसंती देईल.”
“शिखर धवन हा चांगला वनडे खेळाडू आहे. तसेच त्याने वनडे मालिकेत बऱ्यापैकी कामगिरीही केली आहे. पण परदेशात कसोटीमध्ये सलामीला खेळताना त्याचा चांगला विक्रम नाही. मग ते दक्षिण आफ्रिकेत असो, इंग्लंडमध्ये असो किंवा आॅस्ट्रेलियात.”
तसेच गांगुली पुढे म्हणाला, “पण त्याने भारतामध्ये कसोटीत शतके केली आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापक यावर काय निर्णय घेतात हे पहावे लागेल.”
धवनने इंग्लंडमध्ये 3 कसोटी सामने खेळले आहेत पण यात त्याला एकही शतक किंवा अर्धशतक करता आलेले नाही. त्याने या 3 सामन्यात मिळून 20.33 च्या सरासरीने 122 धावा केल्या आहेत.
तसेच बुधवारपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेआधी भारताचा एसेक्स संघाशी 25 ते 27 जुलै दरम्यान सराव सामना पार पडला. या सामन्यातही धवनला दोन्ही डावात धावा करण्यात अपयश आले होते. तो दोन्ही डावात शुन्यावर बाद झाला. मात्र मुरली आणि राहुलने अर्धशतक करत आपल्याकडे लक्ष वेधले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियातील ‘तिल्ली’ हे प्रकरण तुम्हाला माहीत आहे का?
–भारताची यो-यो टेस्टच्या गुणांची पातळी कमी – झहीर खान
–माझ्या वेतनाबद्दल काय? रोहितची पत्नी रितीकाचा प्रश्न