टीम इंडियाचे रिस्ट स्पिनर्स युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत.
एखाद्या सामन्यात बळी मिळवण्यासाठी या दोन्ही गोलंदाजांची जणू स्पर्धाच असते. यामध्ये कधी चहल भारी ठरतो तर कधी कुलदीप.
या दोघांनाही चांगले गोलंदाज बनवण्याचे श्रेय भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीलाही तेवढेच जाते. कारण धोनीने कित्येक वेळी यष्टीमागून दिलेल्या सल्यामुळे दोघांनाही बळी मिळवण्यात यश मिळाले आहे.
नुकतेच एका मुलाखतीमध्ये चहलने त्याला धोनीने एक निकनेम दिले आहे याचा खुलासा केला.
चहलच्या शरिराकडे पाहुन धोनीने त्याचे ‘तिल्ली’ असे निकनेम ठेवले आहे असे चहलने सांगितले.
आता धोनीला पाहून संघातील इतर खेळाडूही त्याला ‘तिल्ली’ अशा नावानेच बोलवतात असे चहलने सांगितले.
गेल्या वर्षभरात चहलने आणि कुलदीपने केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर दोघेही भारताच्या मर्यादीत षटकाच्या संघाचे नियमिच सदस्य झाले आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे कुलदीप यादवच्या सहभागाबद्दल मोठे वक्तव्य






