सध्या भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पूर्व नियोजित पाचवा कसोटी सामना नुकताच पूर्ण झाला आहे. त्यानंतर आता ३ टी२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. त्यातील पहिला टी२० सामना गुरुवारी ७ जुलै रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा पुनरागमन करणार आहे. कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी रोहितला कोरोनाची लागण झाली होती. त्यातून रोहित बरा झाला असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर रोहितने पुनरागमन केले आहे. शिवाय पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात रोहितने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात भारताच्या प्रमुख खेळाडूंना म्हणजेच विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा रिषभ पंत यांना विश्रांंती देण्यात आली आहे. त्यामुळे आयर्लंड विरुद्ध खेळलेल्या संघातील युवा खेळाडूंना संघात स्थान मिळेल अशी आशा होती. त्याच पार्श्वभूमीवर भारताचायुवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
भारताची प्लेइंग ११: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल.
#TeamIndia Playing XI for the 1st T20I.
Live – https://t.co/Xq3B0KTRD1 #ENGvIND pic.twitter.com/vTS7aINk3l
— BCCI (@BCCI) July 7, 2022
इंग्लंडची प्लेइंग ११: जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार & यष्टीरक्षक), डेव्हिड मलान, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, रीस टोपली, मॅट पार्किन्सन.
We lose the toss and will bowl ⚪
🏴 #ENGvIND 🇮🇳 @Vitality_UK
— England Cricket (@englandcricket) July 7, 2022
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गांगुलीनेच मला उपकर्णधार बनवण्यासाठी शिफारस केली होती’, सचिनने उलघडले गुपित
भारताच्या स्टार टेनिसपटूबाबत मोठी बातमी! बहुतेक करियरला पण ‘फुलस्टॉप’
उद्योजक आनंद महिंद्रांकडून धोनीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाले…