Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मँचेस्टर वनडेत ‘रोहितसेने’ची असेल अग्निपरिक्षा, ३९ वर्षांपासून इंग्लंडविरुद्ध जिंकू शकला नाही भारत

मँचेस्टर वनडेत 'रोहितसेने'ची असेल अग्निपरिक्षा, ३९ वर्षांपासून इंग्लंडविरुद्ध जिंकू शकला नाही भारत

July 16, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा इंग्लंड दौरा
rohit-sharma-rahul-dravid

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धचा तिसरा आणि अखेरचा वनडे सामना रविवारी (१७ जुलै) मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगणार आहे. दोन्हीही संघासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असेल. कारण सध्या ३ सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत असून तिसरा सामना जिंकणारा संघ मालिकाही खिशात घालेल. परंतु पाहुण्या भारतीय संघासाठी हा सामना जिंकणे म्हणजे आव्हान असेल. कारण भारताने या मैदानावर खेळलेल्या मागील सामन्यात कोट्यवधी भारतीयांचे हृदय तोडणारी घटना घडली होती. 

धोनी धावबाद झाल्यामुळे तुटल्या होत्या आशा
भारतीय संघ (Team India) यापूर्वी ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford Manchester) मैदानावर २०१९ विश्वचषकातील (2019 World Cup) उपांत्य सामना खेळण्यासाठी उतरला होता. या सामन्यात भारताचा प्रतिस्पर्धी न्यूझीलंड संघ होता, ज्यांनी १८ धावांनी हा सामना जिंकत कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचा चुराडा केला होता. त्यातही एमएस धोनीची (MS Dhoni Runout) विकेट आजही कोणता भारतीय विसरू शकला नसेल.

या सामन्यातील अखेरच्या १२ चेंडूंमध्ये भारताला विजयासाठी ३१ धावांची गरज होती. यावेळी मैदानावर असलेल्या धोनीने लॉकी फर्ग्युसनला पहिल्या चेंडूवर षटकार मारत सर्वांच्या अपेक्षा वाढवल्या होत्या. परंतु तिसऱ्या चेंडूवर २ धावा घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला होता, ज्यामुळे भारताच्या विश्वचषक विजयाच्या अपेक्षांना धक्का बसला होता.

मँचेस्टरवर भारतीय संघाचे रेकॉर्ड आहेत खराब
आता जवळपास ३ वर्षांनंतर भारतीय संघ या मैदानावर पुन्हा एकदा उतरणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत या मैदानावर (India-England Head To Head Record) ११ सामने खेळले असून त्यापैकी ६ सामने गमावले आहेत. तर फक्त ५ सामने जिंकण्यात भारतीय संघाला यश आले आहे. इंग्लंड संघाविरुद्ध भारतीय संघाने या मैदानावर ४ वनडे सामने खेळले आहेत. ज्यातील ३ सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्कारावा लागला आहे.

२२ जून १९८३ मध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे एकमेव वनडे सामना जिंकला होता. त्यानंतर १९८६, १९९६ आणि २००७ मध्ये या मैदानावर इंग्लंडविरुद्ध भारताचा सामना झाला आहे, ज्यामध्ये त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. अशात आता भारतीय संघाला ही नकोशी आकडेवारी मोडत ऐतिहासिक विजय मिळवता येईल की नाही?, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतापुढे ऑस्ट्रेलियाचे आव्हान, सुवर्णपदक जिंकण्यासाठी करतोय तयारी

पंजोबा, आजोबा, वडील सर्वच क्रिकेटपटू होते, पण एका चुकीने संपलय ‘त्याचं’ करिअर

सिंगापूर ओपन २०२२: ३२ मिनिटांतच विरोधी खेळाडूचा धुव्वा उडवत पीव्ही सिंधूने फायनलमध्ये मारली धडक


Next Post
Pakistan Cricket Team vs SL

आफ्रिदीने श्रीलंकन कर्णधाराच्या उडवल्या दांड्या, बाद झाल्यावर स्टम्पकडे पाहतच राहिला

Photo Courtesy: Twitter/BCCI

निर्णायक सामन्याची वेळ बदलली, वाचा कधी सुरू होणार इंग्लंडविरुद्धचा तिसरा वनडे

Rohit-Sharma-Jos-Buttler

शेवटच्या वनडेत कशी असणार मॅंचेस्टरची खेळपट्टी? कोणत्या संघाला होणार फायदा? वाचा सर्वकाही

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143