भारताची इंग्लंड विरुद्ध सध्या 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना शनिवारपासून (18 आॅगस्ट) नॉटिंगहॅम येथे होणार आहे.
या सामन्यासाठी 11 जणांच्या भारतीय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि रिषभ पंत यांची वर्णी लागू शकते.
बुमराह मागील दोनही कसोटी सामन्यात दुखापतीमुळे खेळला नव्हता. बुमराहचा डावा अंगठा जून महिन्यात पार पडलेल्या आयर्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे त्याला इंग्लंड विरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेलाही मुकावे लागले होते.
पण आता तो या दुखापतीतून बरा झाला असल्याचे वृत्त असल्याने त्याला तिसऱ्या सामन्यात संधी मिळू शकते.
बुमराहने याचवर्षी जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 25.21 च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या होत्या.
इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात उमेश यादव, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा हे तीन वेगवान गोलंदाज खेळले होते. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात उमेशच्या ऐवजी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संधी देण्यात आली होती.
पण जर तिसऱ्या कसोटीसाठी बुमराहला संधी मिळाल्यास या गोलंदाजांपैकी एकाला संघाबाहेर बसावे लागेल.
त्याचबरोबर भारताच्या कसोटी संघात पहिल्यांदाच निवड झालेल्या पंतलाही यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक ऐवजी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
कार्तिक इंग्लंड विरुद्ध मागिल दोनही सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरला होता. त्याला दोन सामन्यात मिळून 21 धावाच करता आल्या आहेत. तसेच तो दोनवेळा शून्य धावेवर बाद झाला आहे.
त्यामुळे भारत अ संघाकडून चांगली कामगिरी करणाऱ्या पंत हा त्याला पर्याय म्हणून तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध आहे.
पंतने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 33 सामन्यात 54.50 च्या सरासरीने 1744 धावा केल्या आहेत. यात त्याची 4 शतके आणि 8 अर्धशतके आहेत.
भारताला या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत 2-0 ने पिछाडीवर आहे.
या दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाजांना अपयश आले होते. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–सलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले
–आम्हाला मॉडर्न क्रिकेट कळत नाही, आमचं कोण ऐकणार???
–टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतली शरद पवारांची भेट