एफआयएच महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेला १ जुलैपासून सुरूवात झाली आहे. स्पेन आणि नेदरलॅंड्समध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाचा ब गटात समावेश आहे. ब गटामध्ये भारताबरोबरच इंग्लंड, न्यूझीलंड आणि चीन या संघांचा समावेश आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना आज रविवारी (३ जुलै) इंग्लड विरुद्ध वॅगनर हॉकी स्टेडियम, ऍमस्टेलवीन येथे खेळणार आहे. दोन्ही संघ विजयाने या स्पर्धेची सुरूवात करण्याचा प्रयत्न करणार आहे.
याआधी भारत आणि इंग्लंड संघ टोकियो ऑलम्पिकमध्ये समोरासमोर आले होते. कांस्य पदकाच्या या सामन्यात ग्रेट ब्रिटन अर्थात इंग्लंडने भारताचा ४-३ असा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारत मैदानात उतरणार आहे. हे पदक जिंकले असते तर भारताचे ऑलिम्पिकमधील पहिले पदक ठरले असते.
यावर्षी झालेल्या एफआयएचच्या प्रो लीगमध्ये खेळताना भारताने उत्तम कामगिरी केली होती. भारत पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळला आहे. यामध्ये भारत स्पर्धेशेवटी तिसऱ्या स्थानावर राहिला होता. या यशाने संघाचे मनोबल उंचावले असून ते या विश्वचषक स्पर्धेत चांगला खेळ करण्याची अपेक्षा आहे. तसेच पहिला महिला हॉकी विश्वचषक १९७४मध्ये खेळला गेला. या स्पर्धेत भारत चौथ्या क्रमांकावर राहिला होता.
भारताने ऑलम्पिकमध्ये केलेल्या खेळीनंतर जागतिक क्रमवारीत आतापर्यंतचे सर्वोत्तम सहावे स्थान गाठले होते. सध्या भारताचा संघ जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. प्रो लीगमध्ये त्यांनी १४ सामने खेळले असून ६ सामने जिंकले आहेत, तर प्रत्येकी ४ सामने गमावले आणि अनिर्णित राखले आहेत. प्रो लीगच्या क्रमवारीत भारताने बेल्जियम, स्पेन, इंग्लंड संघांना मागे टाकत तिसरे स्थान गाठले आहे.
विश्वचषकाच्या स्पर्धेत भारत गोलकिपर सविता पूनिया (Savita Punia) हीच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. संघाची महान खेळाडू राणी रामपाल (Rani Rampal) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे या स्पर्धेस मुकली आहे.
https://twitter.com/TheHockeyIndia/status/1543149979799154688?s=20&t=t3Qkx15qnfXEGqnJMIyIng
भारत आणि इंग्लंड महिला संघ सात वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये इंग्लंडचे पारडे जड ठरले असून त्यांनी तीन सामने जिंकले आहेत. त्यातील तीन सामने अनिर्णीत राहिले, तर भारताने एक सामना जिकंला आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता या सामन्याला सुरूवात होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वन आणि डिज्नी हॉटस्टार होणार आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघ-
गोलकिपर- सविता पूनिया, बिचू देवी खरीबाम
डिफेंडर्स- दीप ग्रेस इक्का, गुरजीत कौर, निक्की प्रधान, उदिता
मिडफिल्डर्स- निशा, सुशिला चानू पुख्रमबम, मोनिका, नेहा, ज्योती, नवजोत कौर, सोनिका, सलिमा टेटे
फॉरवर्ड्स– वंदना कटारिया, लालरेमसियामी, नवनीत कौर, शर्मिला देवी
बदली खेळाडू– अक्षता आबासो धेकळे, संगीता कुमारी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: कर्णधारानेच काढला कर्णधाराचा काटा! बुमराहने टिपला स्टोक्सचा नेत्रदीपक झेल
…म्हणून मुंबई इंडियन्स आहे आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ! बुमराह-ब्रॉडच्या ‘त्या’ षटकाशी आहे कनेक्शन