बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतीय महिला हॉकी संघाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. दोन्ही संघांनी ‘अ’ गटात आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात घानाचा ५-० असा पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात वेल्सचा ३-१ असा पराभव केला होता. दुसरीकडे इंग्लिश संघाने घाना आणि कॅनडाचा एकतर्फी पराभव केला आहे. ‘अ’ गटात इंग्लंड अव्वल तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. ‘अ’ गटात अव्वल स्थानावर राहण्यासाठी आजचा सामना सर्वात महत्त्वाचा असेल.
गुरजीत कौर आणि वंदना कटारिया भारतासाठी चांगल्या लयीत दिसत आहेत. गुरजीतने घानाविरुद्ध दोन आणि वेल्सविरुद्ध एक गोल केला, तर वंदनाने वेल्सविरुद्ध दोन गोल केले. यादरम्यान गोलरक्षक आणि संघाची कर्णधार सविता पुनियानेही काही उत्कृष्ट बचाव केला. इंग्लंडची फॉरवर्ड हाना मार्टिन भारतीय संघासाठी अडचणी निर्माण करू शकते. गेल्या काही सामन्यांपासून ती जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. बचावपटू ग्रेस बाल्सॅडनही इंग्लंडसाठी ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो.
१. भारत विरुद्ध इंग्लंड महिला हॉकी संघ सामना कधी होईल?
हा सामना आज (2 ऑगस्ट) संध्याकाळी 06.30 वाजता सुरू होईल.
२. भारत विरुद्ध इंग्लंड महिला हॉकी संघ सामना कोणत्या चॅनलवर होईल?
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.
३. हा सामना ऑनलाइन पाहता येईल का?
होय, या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी LIV ऍपवर थेट पाहता येईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणजे ‘टू इन वन’ मटेरियल! ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले कौतुक
‘शराबी’ अनुष्का शर्मा! व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस
दु:खद! ४००० धावा आणि १२० पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटरचे निधन