---Advertisement---

गोलंदाजांच्या नाकी नऊ आणणारा इंग्लंडचा दिग्गज खेळाडू भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर

On: रविवार, डिसेंबर 13, 2020 2:05 PM
---Advertisement---

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात व्यस्त आहे. ज्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत बहुप्रतिक्षित बॉर्डर- गावसकर मालिकेत खेळणार आहे. हा दौरा संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध आपल्या मायदेशात सामने खेळणार आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्यात ४ सामन्यांची अतिशय महत्त्वाची कसोटी मालिका होणार आहे. कसोटी चॅम्पियशिपमधील आपले स्थान भक्कम करण्यासाठी दोन्ही संघांना या मालिकेत विजय आवश्यक आहे. अशातच आता इंग्लंडचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज जाॅस बटलर या कसोटी मालिकेतील सुरुवातीचे २ सामने खेळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे.

इंग्लंड संघ व्यवस्थापन तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांती देण्याच्या दिशेने पाऊले टाकत आहे. जॉस बटलर मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. भारताचा दौरा करण्याअगोदर इंग्लंड संघ श्रीलंकेत २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. श्रीलंका दौऱ्यात बटलर खेळणार असून बेन स्टोक्स व जोफ्रा आर्चर यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे बटलरला भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात आराम दिल्यानंतर बेन फोक्स त्याच्या जागी यष्टीरक्षक असेल.

इंग्लंड निवड समतीचे अध्यक्ष एड स्मिथ यांनी बेन फोक्स उत्तम कामगिरी करेल, अशी आशा व्यक्त केली आहे. त्यांच्या मते फोक्स हा उत्कृष्ट खेळाडू असून मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करेल. दरम्यान भारताविरुद्धची मालिका महत्त्वाची असल्याने फेब्रुवारीमध्ये बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर संघात पुनरागमन करणार हे जवळपास निश्चित आहे.

इंग्लंड संघ २ जानेवारीला श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. जिथे गाले स्टेडिअममध्ये त्यांना १४ ते १८ जानेवारी दरम्यान पहिला आणि २२ ते २६ जानेवारी दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळायचा आहे. कोरोना व्हायरसमुळे या मालिकेचे आयोजन जैव- सुरक्षित वातावरणात होईल. जिथे चाहत्यांना स्टेडिअममध्ये येण्यास परवानगी नसेल.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाहेर

…तर ऑस्ट्रेलिया ४-० ने मालिका जिंकेल, माजी दिग्गज कर्णधाराची भविष्यवाणी

‘तुझ्या घरचेही तुझ्याबद्दल…’, ट्रोल करणाऱ्या चाहत्याला ‘गब्बर’चा दणका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---