---Advertisement---

भारत का इंग्लंड, वनडे मालिकेत कोण मारणार बाजी? इंग्लिश दिग्गजाने केली भविष्यवाणी

On: मंगळवार, मार्च 23, 2021 3:05 PM
---Advertisement---

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड संघाला कसोटी मालिकेत ३-१ ने आणि टी-२० मालिकेत ३-२ ने पराभूत केले होते. यानंतर आजपासून या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांच्या (२३ मार्च) वनडे मालिकेला प्रारंभ होत आहे. या मालिकेतील तीनही सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. अशातच माजी इंग्लिश कर्णधार माइकल वॉन याने ट्विट करत या मालिकेत कोणता संघ बाजी मारेल? याची भविष्यवाणी केली आहे.

इंग्लंड संघाचा भारतीय दौरा सुरू झाल्यापासूनच माइकल वॉन हा आपल्या ट्विटमुळे खूप चर्चेत आहे. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी वॉनने ट्विट करत कसोटी मालिकेत कोणता संघ जिंकणार याची भविष्यवाणी केली होती. त्यानंतर कसोटी मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने विजय मिळवला होता. तसेच कसोटी मालिका सुरू असताना, खेळपट्टीबद्दल ट्विट करून टीका करत होता.

तसेच आता वनडे मालिका संपण्यापुर्वी त्याने एक ट्विट केले आह, जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “वनडे मालिकेपूर्वीची भविष्यवाणी. जो रूट नाही आणि जोफ्रा आर्चरदेखील नाही. त्यामुळे भारतीय संघ ३-० ने विजय मिळवणार.”

भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने १४ सदस्यांचा संघ जाहीर केला होता. ज्यामध्ये, जो रूट आणि जोफ्रा आर्चर यांचे नाव नव्हते. जो रूटला विश्रांती देण्यात आली आहे. तर, जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त झाल्यामुळे मायदेशी परतला आहे. संघातील मुख्य फलंदाज आणि मुख्य गोलंदाज संघात नसल्यामुळे माइकल वॉन याने हे ट्विट केले असावे. या संघात जैक बॉल, ख्रिस जॉर्डन आणि डेविड मलान या खेळाडूंना राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.

https://twitter.com/MichaelVaughan/status/1374021063978463238?s=20

वनडे मालिकेसाठी असा आहे इंग्लंड संघ
ओएन मॉर्गन (कर्णधार) मोइन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम करन टॉम करन, लियाम लिविंगस्टोन, मॅट पार्किंसन, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपले, मार्क वुड
राखीव खेळाडू- जैक बॉल, ख्रिस जॉर्डन आणि डेविड मलान

महत्त्वाच्या बातम्या-

तुम्हाला माहित आहे का? कृणाल पंड्या व प्रसिद्ध कृष्णाशिवाय ‘या’ खेळाडूंनी केलंय पुण्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण

संघासाठी काहीही करण्यासाठी तयार असलेले ‘हे’ तीन खेळाडू वनडे मालिकेत होऊ शकतात मालिकावीर

इंग्लंडला ‘सळो की पळो’ करुन सोडणारा क्रिकेटर नाही भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये, कर्णधारासहित इंग्लिंश संघ झालाय आनंदी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---