1 आॅगस्टपासून भारतीय संघाची इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरु होणार आहे. ही मालिका 5 कसोटी सामन्यांची होणार असुन पहिला कसोटी सामना बर्मिंगहॅमच्या एजबस्टन मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
या मालिकेआधी एसेक्स संघाशी 25 ते 27 जुलै दरम्यान सराव सामना पार पडला. मात्र या सराव सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनच्या उजव्या हाताला छोटी दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने दुसऱ्या दिवशी गोलंदाजी न करण्याचा निर्णय घेतला होता.
यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली होती. पण आता अश्विननेच इंस्टाग्रामवर गोलंदाजी करतानाचा फोटो शेअर केला आहे. ज्यातून तो फिट असल्याचे त्याने संकेत दिले आहेत. त्याने या फोटोला कॅप्शन दिले आहे की आरामात गोलंदाजी केली.
अश्विनने या सराव सामन्यात फक्त 5 षटके गोलंदाजी केली असून यात त्याने 21 धावा दिल्या मात्र त्याला विकेट घेण्यात अपयश आले.
अश्विनने आत्तापर्यंत 58 कसोटी सामन्यात 25.34 च्या सरासरीने 316 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्याकडून इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत चांगल्या कामगिरीची सर्वांनाच अपेक्षा आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–माजी कसोटीपटू अजय रात्राकडे टीम इंडियाची मोठी जबाबदारी
–स्टुअर्ट ब्रॉड म्हणतो, इंग्लंडमधील खेळपट्ट्या कशा असतील याची क्युरेटरलासुद्धा कल्पना नाही
–इंग्लंडचा सर्वकालीन दिग्गज फलंदाज म्हणतो विराटपासून इंग्लंडला धोका