चेन्नई। चेपॉक स्टेडियम म्हणजे एमए चिदंबरम स्टेडियमवर शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेचा दुसरा सामना सुरु झाला आहे. या सामन्याचा रविवारी(१४ फेब्रुवारी) दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्यात क्षेत्ररक्षणावेळी वाद झाल्याचे दिसले. त्यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला.
झाले असे की इंग्लंडचा पहिला डाव सुरु होता, त्यावेळी आर अश्विनने ५० व्या षटकात ऑली स्टोनला बाद केले. स्टोनचा झेल शॉर्ट मिड विकेटला रोहितने घेतला. त्यानंतर भारतीय क्रिकेटपटू विकेटचे सेलिब्रेशन करण्यासाठी एकत्र आले. त्यावेळी रोहित आणि पंत यांच्यात फार क्वचित पाहायला मिळाला प्रकार निदर्शनास आला. यादरम्यान रोहितने जोराने पंतच्या डोक्यावर मारले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. कित्येक नेटकऱ्यांना रोहित आणि पंतमध्ये काहीतरी बिनसले असल्याचा संभ्रम झाला. त्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
खरे तर, रोहित आणि पंतमध्ये त्यावेळी मस्ती चालू होती. त्यामुळे रोहितने मजेत त्याच्या डोक्यात टपली मारली होती. बीसीसीआयने त्यांच्या वेबसाईटवर शेअर केलेल्या स्टोनच्या विकेटच्या व्हिडिओमध्येही रोहित आणि पंत मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहेत.
रोहित आणि पंत मस्ती करण्याची ही पहिली वेळ नाही, याआधीही अनेकदा त्यांना सामन्यादरम्यान एकमेकांबरोबर मस्ती करताना पाहण्यात आले आहे. तसेच पंतही त्याच्या अनोख्या कृतींमुळे बऱ्याचदा चर्चेत असतो.
You tube thumbnail be like huge fight between rohit &pant 😂#INDvsENG pic.twitter.com/W0swYqnq0u
— Rohitan45 (@rohitan45) February 14, 2021
What was @ImRo45 doing to @RishabhPant17 here??! 👀😂🥲 #INDvENG #INDvsENG pic.twitter.com/h4DssKHHnI
— 🏏Flashscore Cricket Commentators (@FlashCric) February 14, 2021
पंत, रोहित चमकले
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रोहित आणि पंत दोघांनीही शानदार कामगिरी केली आहे. रोहितने पहिल्या डावात २३१ चेंडूत १६१ धावा केल्या. या खेळीत १८ चौकार आणि २ षटकार त्याने मारले. तसेच पंतने नाबाद ५८ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडच्या पहिल्या डावात पंतने यष्टीमागेही चांगली कामगिरी करत २ कमालीचे झेल घेतले. याशिवाय त्याने आर अश्विन आणि विराट कोहलीला डीआरएस रिव्ह्यू घेताना महत्त्वाचा सल्लाही दिला.
https://twitter.com/middlestump4/status/1360879316435800069
सामन्यावर भारताचे वर्चस्व –
दुसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात १८ षटकात १ बाद ५४ धावा केल्या आहेत. तसेच भारतीय संघ सध्या पहिल्या डावातील आघाडीमुळे २४९ धावांनी पुढे आहे.
तत्पूर्वी भारताने पहिल्या डावात रोहित शर्माच्या दीडशतकी तसेच अजिंक्य रहाणे (६७) आणि पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर ३२९ धावा केल्या होत्या. तसेच इंग्लंडला पहिल्या डावात १३४ धावांवर रोखले होते. त्यामुळे भारताने पहिल्या डावात १९५ धावांची आघाडी मिळवली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
हरभजनबद्दची आठवण सांगताना आर अश्विन म्हणाला, ‘माफ कर भज्जू पा, पण मी आनंदी आहे’
भारतीय क्रिकेटर्स सामन्यादरम्यान वापरत आहेत जीपीएस ट्रॅकर, ‘हे’ आहे कारण