---Advertisement---

टाॅप ५- इशांत शर्मा सुसाट, एकाच सामन्यात केले अनेक विक्रम

---Advertisement---

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी इशांत शर्माने चमकदार कामगिरी करत इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत धाडला होता.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात इशांतने तिखट मारा करत भारताकडून या डावात 51 धावात सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.

या कामगिरी बरोबरच इशांतला कसोटी सामन्यात तब्बल तीन वर्षानंतर एका डावात पाच विकेट घेण्याची किमयी साधता आली.

इशांतच्या या कामगिरीच्या जोरावर भारताला, इंग्लंडला दुसऱ्या डावात 180 धावांवर रोखण्यात यश आले.

तसेच या पाच विकेट बरोबरच इशांतने माजी फिरकी गोलंदाज भागवत चंद्रशेखर यांना मागे टाकत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सातवे स्थान प्राप्त केले आहे.

इशांतने त्याच्या कसोटी कारकिर्दितील ८३ सामन्यात २४४ बळी मिळवले आहेत. तर भागवत चंद्रशेखर यांनी ५८ कसोटी सामन्यात २४३ बळी मिळवले होते.

भारताचा तिसरा यशस्वी वेगवान गोलंदाज-

भारताकडून सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्यांच्या यादीत कपिल देव आणि जहीर खान यांच्यानंतर इशांत शर्मा तिसरा वेगवान गोलंदाज आहे.

कपिल देव यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत भारतासाठी सर्वाधिक ४३४ तर जहीर खानने ३११ विकेट मिळवल्या आहेत. त्यानंतर आता इशांत शर्माच्या नावावर २४४ विकेट आहेत.

एजबेस्टन मैदानावर पाच विकेट घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज-

या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा डावात इंग्लंडचे ५१ धावात पाच फलंदाज बाद केले. यापूर्वी या मैदानावर कपिल देव यांनी १९७९ साली १४६ धावात पाच बळी मिळवले होते. तर १९८६ मध्ये चेतन शर्मांनी ५८ धावात पाच बळी मिळवले होते.

आशिया खंडाबाहेर सर्वाधिक वेळा पाच विकेट मिळवणारा इशांत तिसरा गोलंदाज-

आशिया खंडाबाहेर सर्वाधिक वेळा पाच विकेट घेणाऱ्यांच्या यादीत आता इशांत शर्मा आणि इरफान पठाण संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी आहेत. या दोघांनी ७ वेळा पाच विकेट घेतल्या आहेत.

यामध्ये प्रथम स्थानी कपिल देव आहेत. कपिल देव यांनी १२ वेळा तर जहीर खानने ८ पाच विकेट घेतल्या आहेत.

भारताचे यशस्वी कसोटी गोलंदाज-

६१९- अनिल कुंबळे, सामने- १३२
४३४- कपिल देव, सामने- १३१
४१७- हरभजन सिंग, सामने- १०३
३२३- आर अश्निन, सामने- ५९
३११- जहीर खान, सामने- ९२
२६६- बिशन सिंग बेदी, सामने- ६७
२४३- इशांत शर्मा, सामने- ८३

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कभी कभी लगता हैं कोहली ही भगवान हैं

उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जॉन्ग-उनची भारत-इंग्लंड सामन्याला हजेरी!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment