नॉटींगघम। भारताने बुधवारी (22 आॅगस्ट) इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत 203 धावांनी मोठा विजय मिळवला. हा विजय भारतीय संघाने केरळमधील महापूरग्रस्तांना समर्पित केला आहे.
याबद्दल भारताचा कर्णधार विराट कोहलीने विजयानंतर माहिती दिली. तो म्हणाला, “आम्ही संघ म्हणून हा विजय केरळमधील महापूरग्रस्तांना समर्पित करत आहोत. तिथे हा खूप कठिण काळ आहे आणि त्यांच्यासाठी हे आम्ही करु शकतो.”
भारताने हा विजय मिळवत 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-2 असे पुनरागमन केले आहे. या विजयाबद्दल विराट म्हणाला, “या मालिकेमध्ये हा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आम्ही या सामन्यात प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी केली. आम्ही मागील 5 सामन्यांपैकी फक्त लॉर्ड्स कसोटीत खराब कामगिरी केली होती.’
तो पुढे म्हणाला, ‘आम्हा या कसोटीत वर्चस्व राखले कारण आम्ही धावफलकावर चांगल्या धावा लावल्या होत्या आणि त्यानंतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. अश्विननेही दुखापत ग्रस्त असताना चांगली गोलंदाजी केली.’
‘तसेच मला आनंद आहे की आम्ही फलंदाज म्हणून गोलंदाजांसाठी विकेट घेण्यास चांगल्या धावा करु शकलो.’ याबरोबरच विराटने क्षेत्ररक्षकांचेही कौतुक केले आहे आणि वेगवान गोलंदाजांच्या फिटनेसबद्दलही अभिमान वाटतो, असेही विराट म्हणाला.
तसेच विराटने त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचेही आभार मानले आहेत. तो म्हणाला, “मला माझी खेळी पत्नीला समर्पित करायची आहे. ती इथे आहे आणि ती मला नेहेमी प्रोत्साहन देत असते.”
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–कोहलीच्या ‘विराट’ कामगिरीमुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा विक्रम धोक्यात
–बापरे! विराट कोहलीचा असाही एक विक्रम ज्याच्या धोनी-दादा आसपास पण नाहीत
–तिसऱ्या कसोटीतील शेवटच्या दिवशीही पुन्हा खास योगायोग