---Advertisement---

भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यांत कोणत्या खेळाडूवर असेल नजर? वाचा सविस्तर

Team-India-Ireland
---Advertisement---

रविवार २६ जून रोजी, भारतीय क्रिकेट चाहत्यांना कोणता सामना पाहायचा याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. एकीकडे, एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीपूर्वी भारतीय खेळाडू सराव सामन्यात खेळत आहेत. त्याच दिवशी, भारतीय संघ डब्लिनमध्ये आयर्लंडशी टी२० सामना खेळणार आहे. बीसीसीआयने दोन जागी आणि वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी संघ तयार करणे हे भारतीय क्रिकेटमध्ये किती सखोलता आहे हे दर्शवते. त्याचबरोबर हे व्यस्त वेळापत्रकाबद्दल देखील काहीतरी सांगते.

जोपर्यंत टी२० मालिकेचा संबंध आहे, भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील खेळणार आहे. ही मालिका रुतुराज गायकवाड, इशान किशन, आवेश खान, राहुल त्रिपाठी आणि पुनरागमन करणाऱ्या संजू सॅमसन सारख्या अनेक आघाडीच्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या आधी छाप पाडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. विशेषतः, गायकवाडसाठी ही एक महत्त्वाची मालिका आहे कारण त्याने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध टी२० मध्ये फॉर्मसाठी संघर्ष केला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या संघात स्थान मिळूनही संधी न मिळालेले काही खेळाडू – व्यंकटेश अय्यर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, दीपक हुडा आणि इतर खेळाडूनाही ही इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची आशा असेल.

मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवसाठीही ही मालिका महत्त्वाची आहे कारण तो हाताच्या दुखापतीतून परतत आहे. संघ व्यवस्थापन युझवेंद्र चहलला प्राधान्य देईल की रवी बिश्नोईला प्राधान्य देईल हे पाहणे देखील मनोरंजक असेल. योगायोगाने, चहलला ज्या ठिकाणी दोन सामने खेळवले जातील तेथे यश मिळाले आहे.

दरम्यान, आयर्लंडला सर्वात लहान फॉरमॅटमध्ये त्यांच्या अधिक धावा करण्याची आशा असेल. गेल्या वर्षी झिम्बाब्वेविरुद्ध मालिका विजय वगळता, आयर्लंडला गेल्या तीन वर्षांत सर्वात लहान स्वरूपात दाखवण्यासाठी फारसे काही नाही. कर्णधार अँड्र्यू बालबर्नी हा फलंदाजीचा मुख्य आधार राहील. आयर्लंडलाही त्यांच्या आघाडीच्या फळीतील अनुभवी फलंदाज पॉल स्टर्लिंगची गरज आहे. गेल्या महिन्यात टी२० ब्लास्टमध्ये नॉर्थंट्सविरुद्ध शतक झळकावल्यापासून, स्टर्लिंग खराब फॉर्ममध्ये आहे.

हॅरी टेक्टर आयर्लंडसाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे आणि या वर्षी ओमानमध्ये चौरंगी मालिकेत तो चांगला फॉर्मात होता. गॅरेथ डेलनी आणि कर्टिस कॅम्फर त्यांच्या अष्टपैलू क्षमतेने संघाच्या फलंदाजी खोली वाढवतात. वेगवान गोलदाजांमध्ये मार्क एडेअर आणि जोशुआ लिटल हे वेगवान गोलंदाजी करू शकतात. लिटल त्यांना डाव्या हाताचा पर्याय देखील प्रदान करतो. बॅरी मॅककार्थीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोबत काउंटी क्रिकेट खेळण्याचा काहीसा अनुभव आहे तर क्रेग यंग आठ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहे. अँडी मॅकब्राईन आणि जॉर्ज डॉकरेल यांना फिरकी गोलंदाजीची जबाबदारी पार पाडावी लागेल.

केव्हा: आयर्लंड विरुद्ध भारत, पहिला टी २०, २६ जून, रात्री ०९:०० वाजता, भारत

कुठे: द विलेज, डब्लिन

खेळाच्या वेळी हवामान आणि खेळपट्टीकडून काय अपेक्षा करावी: आर्द्रता जास्त असण्याची शक्यता आहे आणि दिवसभरात सतत कधी मधी पाऊस पडू शकतो. साधारणपणे १८०-१८५ च्या आसपास एका डावातील धावा होऊ शकतात. हा मैदानावरील स्पर्धात्मक टोटल असू असतो. भारताने मागच्या दोनवेळी या ठिकाणी टी२० सामना खेळला तेव्हा त्यांना दोनदा २०० हून अधिक धावसंख्या गाठता आली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

हार्दिकच्या नेतृत्वातील पहिल्या सामन्यात पाऊस बनू शकतो व्हिलन? जाणून घ्या पिच रिपोर्ट

उमरान मलिकची पदार्पणाची प्रतिक्षा संपणार? कर्णधार हार्दिक पांड्याने दिले संकेत

प्रशिक्षक चंद्रकांत पंडितांचा ‘मिडास टच’! फक्त मध्य प्रदेशच नाही तर ‘या’ संघांनाही मिळवून दिलंय विजेतेपद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---