आज (5 जून) भारतीय संघ टी20 विश्वचषक 2024 मधील आपला पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडियासमोर आयर्लंडचं आव्हान आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
हा स्पर्धेतील आठवा सामना असून ‘अ’ गटातील दुसरा सामना आहे. कालचा इंग्लंड विरुद्ध स्कॉटलँड सामना पावसामुळे वाहून गेला होता. त्यामुळे आजच्या सामन्याच्या वेळी न्यूयॉर्कचं हवामान कसं असेल? याकडे भारतीय चाहत्याचं लक्ष लागलं आहे. या बातमीद्वारे आम्ही हवामानाबद्दलच्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहोत.
‘वेदर डॉट कॉम’ नुसार, न्यूयॉर्कमध्ये सकाळच्या वेळी आकाश स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. तापमान 30 डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल. मात्र सामन्यादरम्यान पावसाच्या हलक्या सरी किंवा वादळ-वावटळ येण्याचीही शक्यता आहे. हवा नैऋत्य दिशेकडून 15 ते 25 किमी प्रति तास वेगानं वाहू शकते. हवेत 54 टक्के आद्रता राहण्याची शक्यता आहे.
नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत बोलायचं झालं तर, गेल्या सामन्यात खेळपट्टी स्लो होती तसेच आऊटफिल्डही बरीच स्लो होती. त्यामुळे फलंदाजांना चौकार-षटकार मारण्यात अडचण येत होती. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाजांना फायदा मिळू शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडानं गेल्या सामन्यात याचा फायदा घेतला होता. याशिवाय मोठे फटके मारणारे फलंदाज येथे चांगली कामगिरी करू शकतात, जशी हार्दिक पांड्यानं बांग्लादेश विरुद्धच्या सराव सामन्यात केली होती.
संभाव्य प्लेइंग 11
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
आयर्लंड – लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), अँडी बालबर्नी, हॅरी टेक्टर, मायरे अडायर, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, कर्टिस कॅम्फर, बॅरी व्हाइट, जोशुआ लिटल, क्रेग यंग
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा शानदार विजय, इंग्लंडचं मोठं नुकसान
हार्दिक पांड्या दमदार पुनरागमनासाठी सज्ज, ‘हा’ व्हिडीओ पाहिल्यानंतर विरोधी गोलंदाजांचा थरकाप उडेल!
अफगाणिस्तानची टी20 विश्वचषकाला धडाकेबाज सुरुवात! पहिल्याच सामन्यात मिळवला शानदार विजय