भारताचा एक संघ इंग्लंड दौऱ्यावर असून दुसरा संघ आयर्लंडला पोहोचला आहे. आयर्लंडच्या दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. या दौऱ्याला निघण्यापूर्वी भारतीय संघातील काही खेळाडूंनी त्याचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले होते. आयर्लंडमध्ये पोहोचल्यावरही त्यांनी फोटो शेयर केले आहेत.
डबलिन येथे पोहोचल्यावर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने संघसहकाऱ्यांसोबत काढलेला फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. या फोटोमध्ये कार्तिक बरोबर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), इशान किशन (Ishan Kishan), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग इत्यादी खेळाडू आहेत.
https://www.instagram.com/p/CfJkW_KomCw/?utm_source=ig_web_copy_link
कार्तिकने भारतीय संघात पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. याआधी त्याने आयपीएल २०२२ (इंडियन प्रीमियर लीग) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना फिनीशरची योग्य भुमिका पार पाडली होती. तीच लय कायम राखत त्याने भारतासाठी उत्तम खेळी केली. यावरून त्याची आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
इशान आणि ऋतुराज या सलामीवीर जोडीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशेष खेळी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. त्याचबरोबर चहल तिसऱ्या आणि चौथ्या टी२० सामन्यांत विकेट्स घेण्यात यशस्वी झाला. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा पाचवा सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने ही मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली.
आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत भारताचे नेतृत्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याकडे सोपवले आहे. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याला संघाचे उपकर्णधार करण्यात आले आहे. या मालिकेतील पहिला टी२० सामना २६ जून आणि दुसरा टी२० सामना २८ जूनला खेळला जाणार आहे. हे दोन्ही सामने द विलेज, डबलिन येथे खेळले जाणार आहेत.
आयर्लंड दौऱ्यासाठीचा भारतीय संघ खालीलप्रमाणे;
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ENGvsIND: टीम इंडियासाठी गुड न्यूज, फलंदाजांना चारी मुंड्या चीत करणारा पठ्ठ्या मोठ्या संकटातून मुक्त
चाहत्याच्या अचाट स्मरणशक्तीवर सचिनही प्रभावित, प्रत्येक कसोटी शतकाची डिटेल तोंडपाठ- Video
हिटमॅन ठरणार विक्रमवीर! पहिल्या कसोटीत आफ्रिदीचा ‘हा’ विक्रम मोडित काढणार