भारतीय संघ शुक्रवारी (२४ जून) आयर्लंडची राजधानी डबलिन येथे पोहोचला आहे. या दौऱ्यात आयर्लंड विरुद्ध भारत (Ireland vs India) दोन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी (२६ जून) डबलिनच्या मालाहिदे, द विलेज क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याकडे सोपवले आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ या मालिकेसाठी उत्सुक असून दोघांनी त्यासाठी कसून तयारी केली आहे. मात्र या दोन्ही सामन्याला खराब हवामानाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
स्थानिक हवामानाच्या रिपोर्टनुसार, दोन्ही सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. डबलिन येथे २६ आणि २८ जून या दोन्ही दिवशी पाऊस पडण्याची पूर्णपणे खात्री देण्यात आली आहे. पहिल्या सामन्यात जोरदार तर दुसऱ्या सामन्यात कमी पाऊस पडू शकतो असे तेथील हवामान खात्याने सांगितले आहे.
डबलिनच्या मैदानावर आतापर्यंत तीन टी२० सामने खेळले गेले आहेत. हे क्रिकेट स्टेडियम छोटे असून यामध्ये १००० पर्यंत आसनक्षमता असून ११५०० प्रेक्षक सामने पाहू शकतात. भारतीय संघ पहिल्यांदाच या मैदानावर सामना खेळणार आहे. या मैदानाची खेळपट्टी मोठ्या धावसंख्येची आहे. येथे झालेल्या मागील पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये १८० पेक्षा अधिक धावा झाल्या आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २००चा आकडा पार केला आहे.
भारताने आयर्लंड विरुद्ध तीन टी२० सामने खेळले असून हे तिन्ही सामने भारताने जिंकले आहेत. या मैदानावर २०१८मध्ये झालेल्या दोन टी२० सामन्यांमध्ये भारताने ७६ आणि १४३ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. हे दोन्ही सामने मालाहिदे येथेच खेळले गेले होते. त्याआधी भारतीय संघाने २००९च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत आयर्लंडचा ८ विकेट्सने पराभव केला आहे.
भारतीय संघातील सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि पांड्या यांच्यावर विशेष कामगिरी करण्याची जबाबदारी असणार आहे. या तिघांनीही आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये किमान २०० धावा केल्या आहेत.
पाऊस नेहमी क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अडथळा बनला आहे. नुकतेच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका शेवटचा मालिका निर्णायक टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
भारतीय संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
आयर्लंडचा संघ:
अँड्रयू बालबर्नी (कर्णधार), मार्क अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी (यष्टीरक्षक), जोश लिटिल, एंड्रयू मॅकब्रायन, बैरी मॅककार्थी, कॉनर ओल्फर्ट, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर, क्रेग यंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनी आणि केएल राहुलवर स्मृती मंधाना पडली भारी, टी२० क्रिकेटमध्ये पार केला मैलाचा दगड
उमरान, अर्शदीप की त्रिपाठी, पहिल्या टी२०त कोणाला खेळवणार? कर्णधार हार्दिकने दिली प्रतिक्रिया
बिग ब्रेकिंग! टीम इंडियाला मोठा झटका, कर्णधार रोहित शर्मा कोरोनाच्या विळख्यात