भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा संपवून रविवारी न्यूझीलंड दौऱ्यासाठी ऑकलंडला पोहचला आहे. या दौऱ्यात ५ वनडे आणि ३ टी२० सामन्यांच्या मालिका होणार आहेत.
या दौऱ्यासाठी जेव्हा भारतीय संघ ऑकलंडला पोहचला तेव्हा एअरपोर्टवर चाहत्यांनी भारतीय खेळाडूंचे स्वागत केले आहे. भारतीय खेळाडूही काही चाहत्यांना ऑटोग्राफ देताना दिसले. याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Hello #TeamIndia. Auckland welcomes you #NZvIND ✈️😎🇮🇳🇮🇳 pic.twitter.com/8ER80bKS5b
— BCCI (@BCCI) January 20, 2019
या दौऱ्याची सुरुवात नेपीयर वनडेने २३ जानेवारी रोजी होणार आहे. तर वेलिंग्टनला ५वा वनडे सामना ३ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे.
टी२० मालिकेला ६ फेब्रुवारी रोजी वेलिंग्टनला होणाऱ्या सामन्याने सुरुवात होणार आहे. तर या दौऱ्याचा शेवटचा सामना हॅमिल्टनला १० फेब्रुवारी रोजी होणार आहे.
या दौऱ्यासाठी भारतीय संघाची यापुर्वीच घोषणा झाली असून या दौऱ्यात वनडे तसेच टी२० मालिकेत युवा क्रिकेटपटू शुभमन गिल आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची शक्यता आहे.
असा आहे भारताचा न्यूझीलंड दौरा-
वनडे मालिका-
पहिला वनडे सामना- नेपीयर- २३ जानेवारी, सकाळी ७.३० वाजता
दुसरा वनडे सामना- माऊंट मॉनगनुई- २६ जानेवारी, सकाळी ७.३० वाजता
तिसरा वनडे सामना- माऊंट मॉनगनुई- २८ जानेवारी, सकाळी ७.३० वाजता
चौथा वनडे सामना- हॅमिल्टन- ३१ जानेवारी, सकाळी ७.३० वाजता
पाचवा वनडे सामना- वेलिग्टंन- ०३ फेब्रुवारी, सकाळी ७.३० वाजता
टी२० मालिका-
पहिला टी२० सामना- वेलिग्टंन- ०६ फेब्रुवारी, दुपारी १२.३० वाजता
दुसरा टी२० सामना- ऑकलंड- ०८ फेब्रुवारी, सकाळी ११.३० वाजता
तिसरा टी२० सामना- हॅमिल्टन- १० फेब्रुवारी, दुपारी १२.३० वाजता
न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), शुभमन गिल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, केदार जाधव, विजय शंकर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, मोहम्मद शमी.
न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), विजय शंकर, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, शुभमन गिल, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिदार्थ कौल, खलील अहमद.
महत्त्वाच्या बातम्या-
–ऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का
–अजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व