---Advertisement---

भारत-न्यूझीलंड संघात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…

On: गुरूवार, फेब्रुवारी 20, 2020 11:55 PM
---Advertisement---

वेलिंग्टन । उद्यापासून (21 फेब्रुवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेसिन रिझर्व (Basin Reserve) येथे सुरु होणार आहे.

भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये 24वा कसोटी सामना खेळणार आहे. यापूर्वी न्यूझीलंडमध्ये खेळण्यात आलेल्या 23 सामन्यांपैकी 5 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळविला. तर 8 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला. त्याचबरोबर उर्वरित 10 सामने अनिर्णित राहिले.

न्यूझीलंडचा संघाने भारताविरुद्धच्या मालिकेंआधी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत 3-0 असा पराभव स्विकारला होता. त्यामुळे आता या पराभवाला मागे सोडत आपल्या घरच्या मैदानावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करतील

तसेच या कसोटी मालिकेआधी भारताने न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेत 5-0च्या मोठ्या फरकाने पराभूत केले होते. त्यानंतर न्यूझीलंडने पुनरागमन करत 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताला पराभूत केले होते. यानंतर आता दोन्हीही संघ कसोटीमध्ये एकमेकांसमोर आव्हान उभे करतील.

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून मयंक अगरवालसोबत (Mayank Agarwal) पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरणार असल्याची दाट शक्यता आहे, याबद्दल बुधवारी पत्रकारांशी बोलताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) संकेत दिले आहेत.

त्याचबरोबर यष्टीरक्षणाची जबाबदारी रिषभ पंतऐवजी (Rishabh Pant) भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला (Wriddhiman Saha) मिळण्याची शक्यता आहे.

उद्या होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिल्या कसोटी सामन्याबद्दल सर्वकाही…

कधी होणार भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला कसोटी सामना?

– भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला कसोटी सामना शुक्रवारी (21 फेब्रुवारी) होणार आहे.

कुठे होणार आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला कसोटी सामना?

-भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला कसोटी सामना बेसिन रिझर्व, वेलिंग्टन येथे होणार आहे.

किती वाजता सुरु होणार भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला कसोटी सामना?

-भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला कसोटी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 4.00 वाजता सुरु होईल.

कोणत्या चॅनेलवर पाहता येणार भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला कसोटी सामना?

-भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला कसोटी सामना स्टार नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला कसोटी सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?

-भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला कसोटी सामना हॉटस्टार या वेबसाईटवर ऑनलाईन पाहता येणार आहे.

कसोटी सामन्यासाठी असा असेल न्यूझीलंड संघ- 

केन विलियमसन (कर्णधार), टॉम लॅथम, टॉम ब्लंडेल, रॉस टेलर, हेन्री निकोलस, बीजे वॉटलिंग, कॉलिन डि ग्रँडहोम, टीम साऊथी, नील वॅगनर, ट्रेंट बोल्ट, एजाज पटेल, काईल जेमिसन, डेरेल मिशेल, मॅट हेन्री(पहिल्या कसोटी सामन्यासाठी नील वॅगनरसाठी राखीव खेळाडू)

कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ – 

विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, इशांत शर्मा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---