---Advertisement---

आजचा प्रजासत्ताक दिन टीम इंडियासाठी या कारणामुळे ठरला खास

On: शनिवार, जानेवारी 26, 2019 3:30 PM
---Advertisement---

भारताने न्यूझीलंडवर आज (26 जानेवारी) झालेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात 90 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत 2-0ने आघाडी मिळवली आहे.

हा विजय भारतीय संघासाठी खास ठरला आहे. कारण त्यांनी पहिल्यांदाच 26 जानेवारीला वन-डे सामन्यात विजय मिळवला आहे. याआधी भारताने याचदिवशी 3 वन-डे सामने खेळले आहेत. हे तीनही सामने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये झाले असून त्यातील एका सामन्याचा निकाल लागला नाही तर दोन सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे.

1986 आणि 2000 मध्ये एडलेडवर झालेल्या दोन्ही वन-डे सामन्यात भारत पराभूत झाला. तर 2015च्या सिडनी येथे झालेल्या सामन्याचा निकाल लागला नाही.

आजच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथमच भारताच्या पहिल्या पाचही फलंदाजांनी 40 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.

सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या 154 धावांच्या तुफानी सलामी भागीदारीमुळे भारताला चांगली सुरूवात मिळाली. या दोघांनीही अर्धशतके केली. रोहितने 87 आणि धवनने 66 धावा केल्या. तर कर्णधार विराट कोहलीने 43 धावा, अंबाती रायडूने 47 धावा  आणि यष्टीरक्षक एमएस धोनीने 48 धावा केल्या होत्या. यामुळे भारताने न्यूझीलंडला 325 धावांचे लक्ष दिले होते.

फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. यावेळी कुलदिप यादवने 45 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2, मोहम्मद शमी आणि केदार जाधव या दोघांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

हिटमॅन रोहित शर्माने या दिग्गजांच्या यादीत मिळवले अव्वल स्थान

कर्णधार रहाणेने केली ‘अजिंक्य’ खेळी…

शिखर धवनला सतावत आहे या गोष्टीची चिंता…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment