---Advertisement---

IND vs NZ: तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियात 2 बदल होण्याची दाट शक्यता! हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोण वरचढ?

On: शनिवार, जानेवारी 24, 2026 6:10 PM
---Advertisement---

भारतीय संघ गुवाहाटीमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून मालिकेत 3-0 अशी अजेय आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल (T20 series IND vs NZ). सलग दोन सामने जिंकल्यानंतर टीम इंडिया सध्या 2-0 ने पुढे आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करून भारत मालिका खिशात घालण्यास उत्सुक आहे, तर न्यूझीलंडला मालिकेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य आहे.

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे पारडे जड राहिले आहे. या दोन संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने झाले आहेत. त्यामध्ये भारताने 16 सामने तर न्यूझीलंडने 10 सामने जिंकले आहेत. त्याचसोबत एक सामन्यात बरोबरी झाली होती.

गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. येथे खेळलेल्या 4 सामन्यांपैकी भारताला फक्त 1 विजय मिळाला आहे, तर 2 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. एक सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे या मैदानावर आपली कामगिरी सुधारण्याचे भारतासमोर आव्हान असेल.

टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने योग्य संघ निवडण्यासाठी भारत या सामन्यात काही बदल करू शकतो. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) प्लेइंग इलेव्हनमध्ये परतण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हर्षित राणाला संघाबाहेर बसावे लागेल., जर उपकर्णधार अक्षर पटेल पूर्णपणे फिट असेल, तर त्याला पुन्हा संघात स्थान मिळू शकते. यामुळे कुलदीप यादवला विश्रांती दिली जाऊ शकते. कुलदीपने मागील सामन्यात 2 विकेट घेतल्या होत्या, मात्र अक्षर पटेल खालच्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करत असल्याने त्याला प्राधान्य दिले जाऊ शकते.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन (Playing Elevan)

भारतीय संघ:
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह.

न्यूझीलंड संघ:
डेवोन कॉनवे, टिम सिफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिशेल, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर (कर्णधार), जॅक फोक्स, मॅट हेन्री, ईश सोढी, जेकब डफी.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---