---Advertisement---

चक्क क्रीडामंत्री म्हणतात, सुपर ओव्हरवर बंदी घालायला हवी

On: गुरूवार, जानेवारी 30, 2020 7:59 PM
---Advertisement---

काल (29 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड (india vs New Zealand) संघात सेडन पार्क (Seddon Park) येथे 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना (3rd Match) पार पडला. हा सामना भारताने सुपर ओव्हरमध्ये (Super Over) जिंकला.

मागील 6 महिन्यातील न्यूझीलंडची ही सुपर ओव्हरनंतर पराभूत होण्याची तब्बल तिसरी वेळ आहे. त्यामुळे न्यूझीलंडचे क्रीडामंत्री ग्रँट रॉबर्टसन (Grant Robertson) हे निराश झाले होते. तसेच यापुढे सुपर ओव्हरवर बंदी घालण्यात यावी असे त्यांनी म्हटले आहे.

कालचा सामना झाल्यानंतर रॉबर्टसन यांनी ट्विट केले की, “मला असे वाटते की लोकांची मानसिक तंदुरुस्ती कायम ठेवण्यासाठी लवकरच सुपर ओव्हरवर बंदी घालण्यासाठी एक बिल सादर करावे लागेल. (सामन्यात विलियम्सनने उत्कृष्ट कामगिरी केली.)”

https://twitter.com/grantrobertson1/status/1222473178565361669

महत्त्वपूर्ण म्हणजे सुपर ओव्हरमध्ये आतापर्यंत न्यूझीलंडची कामगिरी खूपच खराब ठरली आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाने 7 वेळा सुपर ओव्हर खेळली आहे. यामध्ये त्यांना 6 वेळा पराभूत व्हावे लागले आहे. तर 1 वेळा त्यांनी विजय मिळवला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---