---Advertisement---

युवराज सिंगने ‘हिटमॅन’ रोहित शर्माचे असे केले कौतुक

On: गुरूवार, जानेवारी 30, 2020 8:24 PM
---Advertisement---

बुधवारी (29 जानेवारी) सेडन पार्क (Seddon Park) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना (3rd Match) पार पडला. या सामन्यात भारताने सुप ओव्हरमध्ये (Super Over) विजय मिळवला. तसेच मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.

या सामन्यातील सुपर ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावांची गरज होती. यावेळी या दोन्ही चेंडूवर भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला. तसेच रोहितने त्याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताकडून या सामन्यात 65 धावांची खेळी केली होती.

त्यामुळे भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने (Yuvraj Singh) रोहितच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसा केली आहे.

युवराजने रोहितची प्रशंसा करताना ट्विटर केले आहे की, “खूप छान खेळलास रोहित.”

या सामन्यात प्रथम फलंदाजीला आल्यानंतर भारताने रोहितच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 5 बाद 179 धावा केल्या होत्या. पण न्यूझीलंडनेही निर्धारित 20 षटकात 6 बाद 179 धावा केल्याने सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सुपर ओव्हर घ्यावी लागली.

सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 17 धावा करत भारताला 18 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुलने मिळून 20 धावा करत भारताला विजय मिळवून दिला. सुपर ओव्हरमध्ये रोहितने 15 आणि राहुलने 5 धावा केल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---