---Advertisement---

IND vs NZ: चौकार-षटकारांचा पाऊस पडणार की गोलंदाज गाजवणार मैदान? जाणून घ्या पहिल्या वनडेसाठी खेळपट्टीचा अंदाज!

On: शुक्रवार, जानेवारी 9, 2026 7:05 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 11 जानेवारी रविवार पासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना वडोदरा येथे खेळवला जाईल. भारतीय चाहते पुन्हा एकदा विराट कोहली (Virat Kohli & Rohit Sharma) आणि रोहित शर्मा यांच्याकडून धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा करत आहेत. विशेष म्हणजे, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या पुनरागमनामुळे भारतीय संघ अधिक शक्तिशाली दिसत आहे.

हा सामना वडोदरा येथील नूतन कोटंबी स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर आतापर्यंत फक्त एकच आंतरराष्ट्रीय सामना झाला आहे. त्या सामन्यात खेळपट्टी पूर्णपणे फलंदाजांसाठी पोषक असल्याचे दिसून आले होते. खेळपट्टीवर चांगला बाऊन्स असल्याने चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो, त्यामुळे हा सामना हाय-स्कोरिंग (मोठ्या धावसंख्येचा) होण्याची दाट शक्यता आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते.

दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका न खेळलेला शुबमन गिल (Shubman gill) आता पूर्णपणे फिट आहे. तो रोहित शर्मासोबत सलामीला येईल. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर खेळतील. अय्यरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करून संघात पुनरागमन केले आहे. ऋषभ पंत संघात असला तरी, पहिल्या सामन्यात केएल राहुलला यष्टिरक्षक (विकेटकीपर) म्हणून संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. राहुल पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya) अनुपस्थितीत सहाव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा असेल. तर नीतीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---