वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (1st Match of 2 Matches Test Series) सुरु आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा(22 फेब्रुवारी) खेळ संपल्यानंतर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीने (Ishant Sharma) भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माबद्दल (Ishant Sharma) आपले मत व्यक्त केले आहे.
यावेळी इशांतबद्दल बोलताना साऊथी म्हणाला की, “तो दीर्घकाळापासून एक जागतिक दर्जाचा वेगवान गोलंदाज आहे.”
“जेव्हा सामन्यापूर्वी आपली पूर्ण तयारी झालेली नसते तसेच आपल्याला दुखापतीला सामोरे जावे लागते तेव्हा आपण आपले मागील अनुभवांची मदत घेऊ शकतो,” असे साऊथी म्हणाला.
“इशांतने आतापर्यंत 90 च्या आसपास कसोटी सामने खेळले आहेत. तसेच कसोटी सामन्यासाठी स्वत: ला योग्य बनवण्यासाठी काय करावे लागेल हे त्याला माहिती आहे. कारण जेव्हा तयारी केलेली नसते तेव्हा तो चांगली कामगिरी करण्याचा मार्ग शोधू शकतो,” असेही इशांतबद्दल बोलताना साऊथी म्हणाला.
वेलिंग्टनला सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इशांतने 5 विकेट्स घेतल्या आहेत. यापैकी पहिले तीन विकेट्स त्याने कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी घेतल्या. तर, पुढच्या 2 विकेट्स त्याने आज (23 फेब्रुवारी) घेतल्या.
आज (23 फेब्रुवारी) या सामन्यातील तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 348 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्या डावात 183 धावांची आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव 165 धावांवरच संपुष्टात आला.
तसेच आज तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 4 बाद 144 धावा केल्या आहेत. तसेच अजून भारत 39 धावांनी पिछाडीवर आहे.
…म्हणून मयंक अगरवालची विकेट ठरली टीम साऊथीसाठी अविस्मरणीय https://t.co/uAS9ti5N2v#म #मराठी #cricket #NZvIND
— Maha Sports (@Maha_Sports) February 23, 2020
न्यूझीलंड संघाला मोठा धक्का, हा खेळाडू दोन दिवस उतरणार नाही मैदानात…https://t.co/uvM3g900PH#म #मराठी #cricket #INDvsNZ
— Maha Sports (@Maha_Sports) February 23, 2020