टी२० विश्वचषकानंतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी२० आणि कसोटी मालिका खेळली जाणार आहे. उभय संघांमध्ये बुधवारी (१७ नोव्हेंबर) टी२० मालिकेला सुरूवात होणार आहे. भारतीय संघासाठी ही टी-२० मालिका खास असणार आहे. भारताला या मालिकेत रोहित शर्माच्या रुपात नवीन टी-२० कर्णधार मिळणार आहे. तसेच राहुल द्रविडच्या रुपात नवीन मुख्य प्रशिक्षकही मिळणार आहेत.
भारताचे टी२० विश्वचषकातील प्रदर्शन खूपच खराब राहीले आहे आणि त्यानंतर भारतीय संघ एक नवीन सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असेल, तर दुसरीकडे न्यूझीलंडलाही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव मिळाल्यामुळे निराशा झाली आहे आणि संघ पराभवानंतर चांगले प्रदर्शन करू इच्छित असेल.
न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सनला या टी२० मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी त्यांचा वेगवान गोलंदाज टिम साउदी संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच भारताच्या विराट कोहलीलाही या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.
भारत आणि न्यूझीलंड संघ आतापर्यंत १७ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकमेकांना भिडले आहेत. यादरम्यान न्यूझीलंडेच पारडे भारतापेक्षा थोडे जड असल्याचे दिसत आहे. न्यूझीलंडने यापैकी ९ सामन्यात विजय मिळवला आहे, तर भारताने यापैकी ८ सामने जिंकले आहेत.
उभय संघांमध्ये खेळल्या गेलेल्या मागच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेचा विचार केला तर, यामध्ये भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळतो. ही टी२० मालिका २०२० मध्ये न्यूझीलंडमध्ये खेळली गेली होती. भारतीय संघाने या पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड संघावर पूर्णपणे वर्चस्व राखले होते. या मालिकेदरम्यान भारतीय खेळाडूंने उत्कृष्ट प्रदर्शन केले होते आणि न्यूझीलंड संघाला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नव्हता.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शेवटचा सामना टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीमध्ये खेळला गेला होता. या सामन्यात मात्र भारताचा न्यूझीलंडने दारुण पारभव केला होता. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली होती आणि भारतीय संघाल २० षटकात अवघ्या ११० धावांवर रोखले होते. यामध्ये भारताठी रविंद्र जडेजाने सर्वाधिक २६ धावा केल्या होत्या, तर न्यूझीलंडसाठी मार्टिन गप्टिलने ४९ आणि कर्णधार विलियम्सनने ३३ धावांची महत्वाची खेळी करून संघाला सहज विजय मिळवून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘ही २००७ ची गोष्ट आहे…’, रोहितने द्रविडच्या नेतृत्त्वाखाली केलेल्या पदार्पणाच्या आठवणींना दिला उजाळा
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलला आयसीसीने दिले ‘हे’ मोठे पद, अनिल कुंबळेची घेणार जागा