---Advertisement---

केएल राहुलने केन विलियम्सनला केली ही खास विनंती, पहा व्हिडिओ

On: सोमवार, फेब्रुवारी 3, 2020 1:40 PM
---Advertisement---

काल (2 फेब्रुवारी) बे ओव्हल (Bay Oval), माऊंट मॉनगनुई (Mount Maunganui) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अंतिम सामना (Last Match) पार पडला.  हा सामना भारताने 7 धावांनी (Won By 7 Runs) जिंकला असून मालिका 5-0ने खिशात घातली.

या सामन्यानंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) केन विलियम्सनला (Kane Williamson) एक विनंती केली आहे.

या विनंतीचा व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

विलियम्सनबद्दल बोलताना राहुल म्हणाला की, “2014-15 मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये खेळताना विलियम्सनबरोबर बराच वेळ घालवला. त्याचबरोबर त्याच्याशी फलंदाजीबद्दल चर्चाही केली. तसं पाहिलं तर त्याच्या आणि माझ्या फलंदाजीत बरेचसे साम्य होते. त्यामुळे त्याच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले.”

“विलियम्सनला खेळताना पाहणे ही माझ्यासाठी चांगली संधी आहे. तथापि,मी आशा करतो की पुढे होणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेमध्ये विलियम्सनने भारताविरुद्ध अधिक धावा करू नये. तसेच आयपीएलमध्येही त्याला चांगली फलंदाजी करताना मला पाहायचे नाही कारण तो आमच्या संघाविरुद्ध खेळेल. परंतु, इतर कोणत्याही मालिकेत त्याने चांगली कामगिरी करावी,” असे विलियम्सनबदद्ल गमतीने बोलताना राहुल म्हणाला.

राहुलने न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 224 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---