भारतीय वन-डे क्रिकेटमध्ये सध्या रोहित शर्मा नावाचे वादळ चांगलेच गाजत आहे. सलामीवीर म्हणून हा खेळाडू सध्या जागतिक क्रिकेट गाजवत आहे. परंतु रोहित हा सलामीवीर होण्यापाठीमागे भारताचा यशस्वी माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीचा मोठा हात आहे.
धोनीने २०१३मध्ये घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय वन-डे क्रिकेट संघाला रोहित नावाचा स्फोटक फलंदाज सलामीवीर मिळाला. याच रोहितने २००७मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्द मधल्या फळीतील फलंदाज म्हणून केली होती.
2007मध्ये वन-डेमध्ये पदार्पण केलेल्या रोहितने 2013पासून सलामीला खेळायला सुरूवात केली. तेव्हा त्याला धोनीने सलामीला खेळण्याचे सुचविले होते. धोनीचा हा निर्णय त्याच्यासाठी चांगलाच लाभदायक ठरला आहे.
“मी मान्य करतो धोनीने माझ्याबाबतचा घेतलेला तो निर्णय योग्यच होता. यासाठी मी धोनीचे आभार मानतो”, असे रोहितने आधीच म्हटले आहे.
पहिल्या 50 वन-डे सामन्यात रोहितने 31.52च्या सरासरीने 1135 धावा केल्या आहेत. यात त्याने 2 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत. तर नंतरच्या 50 सामन्यात 12 अर्धशतकांच्या मदतीने 32.02च्या सरासरीने 1345 धावा केल्या आहेत.
100 सामने झाल्यावर रोहितची सरासरी ठीकठाक होती. त्यानंतर उर्वरीत 99 सामन्यात त्याने 20 शतकांसह 5319 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर रोहितला सलामीवीर म्हणून जलद 6000 वन-डे धावा करण्याची संधी आहे. यासाठी त्याला 168 धावांची गरज आहे. सध्या त्याने सलामीवीर म्हणून 114 डावांमध्ये 5832 धावा केल्या आहेत. या 6000 धावा करण्यासाठी त्याच्याकडे 8 डाव बाकी आहेत.
रोहितच्याआधी दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमलाने 123 डावांमध्ये आणि भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरने 133 डावांत सलामीला येताना 6000 धावांचा टप्पा गाठला आहे.
आतापर्यंत रोहितने 199 वनडे सामने खेळले असून त्यात 48.14च्या सरासरीने 7799 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 22 शतके आणि 39 अर्धशतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–अशी सुवर्णसंधी रोहित शर्माला पुन्हा कधीही मिळणार नाही
–५२ वर्षांत जे घडले नाही ते रोहित सेनेला न्यूझीलंडमध्ये करण्याची संधी
–रोहित करणार असा काही कारनामा की धोनी- विराट पाहातच रहातील