आज टीम साऊथीच्या गोलंदाजीवर असा झाला पृथ्वी शॉ बोल्ड…! पहा व्हिडिओ

वेलिंग्टन । आज (21 फेब्रुवारी) बेसिन रिझर्व (Basin Reserve) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या दिवसाखेर 5 बाद 122 धावा केल्या आहेत. यामध्ये भारताचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) त्रिफळाचीत झाला.

सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरेलल्या शॉने 18 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 16 धावा केल्या. मात्र चांगली सुरुवात मिळूनही तो न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीच्या (Tim Southee) गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.

साऊथीचा आऊटस्विंगर चेंडू शॉला अडवता आला नाही आणि त्यामुळे चेंडू पॅडच्या आऊटसाइड एजला स्पर्श होऊन स्टंप्सवर जाऊन लागला. त्यामुळे शॉ 16 धावांवरच बाद झाला.

अशा प्रकारे बाद होण्याची शॉची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी तो कसोटी सराव सामन्यातही याच पद्धतीने बाद झाला होता.

पहिल्या कसोटी सामन्याच्या एक दिवसाआधी भारतीय संघाचा कर्णधार विराटने कोहलीने (Virat Kohli) आपल्या युवा सलामीवीर फलंदाज शॉवर विश्वास व्यक्त केला होता. त्याचबरोब रोहित शर्माच्या (Rohit Sharma)  आणि केएल राहुलच्या (KL Rahul) अनुपस्थितीत चांगली सुरुवात करण्यासाठी शॉला पाठिंबाही दर्शविला होता.

“शॉ हा प्रतिभावान खेळाडू आहे. त्याची स्वत:ची खेळण्याची एक शैली आहे. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की, तो ज्याप्रकारे खेळतो तसेच त्याने नेहमी खेळावे,” असे कर्णधार विराट म्हणाला.

शॉने आतापर्यंत 2 कसोटी आणि 3 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत 237 धावा केल्या आहेत. त्यात 1 अर्धशतक आणि 1 शतकाचा समावेश आहे. तर वनडेत त्याने 84 धावा केल्या आहेत.

 

You might also like