ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या यशस्वी सांगतेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये पोहचला आहे. येथील मैदाने जरी आव्हानात्मक असली तरी काही भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडला याआधी केलेल्या दौऱ्यांमध्ये सळो की पळो करून सोडले होते.
न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यात न्यूझीलंडमध्ये झालेल्या वन-डे मालिकेतील पहिल्या पाच महत्त्वपूर्ण खेळी बघुया. ज्यातील पहिल्या चार भारतीय फलंदाजांच्याच आहेत.
1) सचिन तेंडुलकर (नाबाद 163 धावा, ख्राईस्टचर्च, 2009)-
सचिनने न्यूझीलंडमध्ये 2009ला ख्राईस्टचर्च येथे खेळताना त्याने 16 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने नाबाद 163 धावा केल्या होत्या. हे सचिनचे वन-डे क्रिकेटमधील 43वे तर न्यूझीलंडमधील पहिले शतक ठरले होते.
या सामन्यात युवराज सिंगने 87 आणि एमएस धोनीने 68 धावा केल्या होत्या. यामुळे त्यांनी न्यूझीलंडसमोर 393 धावांचे लक्ष ठेवले होते. हा सामना भारताने 58 धावांनी जिंकत 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत 2-0ने आघाडी घेतली होती.
2) विरेंद्र सेहवाग (नाबाद 125 धावा, हॅमिल्टन, 2009)-
2008-09 च्या या मालिकेत सेहवागने पहिल्याच सामन्यापासून त्याच्या स्फोटक फलंदाजीला सुरूवात केली होती. हॅमिल्टन येथे झालेल्या चौथ्या वन-डे सामन्यात त्याने नाबाद 125 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भुमिका पार पाडली होती. या सामन्यात त्याने 60 चेंडूमध्येच त्यावेळेचे जलद शतक केले होते.
270 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सामन्यात तीनदा पावसाचा व्यत्यय आल्याने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारतासमोर 118 धावांचे लक्ष होते. मात्र सेहवाग आणि गौतम गंभीरने 23.3 षटकातच 201 धावा करत संघाला 84 धावांनी विजय मिळवून दिला होता.
2008-09च्या दौऱ्यात भारतीय संघ एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडमध्ये खेळला होता. यामध्ये भारताने पाच सामन्यांची वन-डे मालिका 3-1ने जिंकली होती.
या मालिकेत भारतीय फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली होती. त्यामध्ये सेहवागने सर्वाधिक 299 धावा केल्या होत्या.
3) राहुल द्रविड (नाबाद 123, ताऊपो, 1999)-
1999च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा 461 करणाऱ्या द्रविडने ताऊपो येथे झालेल्या वन-डे सामन्यातून उत्तम कामगिरी करण्यास सुरूवात केली होती. 1999च्या विश्वचषकाआधी झालेल्या या सामन्यात द्रविडने नाबाद 123 धावा करत त्याच्या वन-डे कारकिर्दीतील दुसरे शतक केले होते.
सचिन शून्यावर बाद झाला असता द्रविडने सौरव गांगुलीच्या साथीने भारताचा डाव सुधारण्यास मदत केली . त्यादोघांनी 113 धावांची महत्तवपूर्ण भागीदारी रचत न्यूझीलंड समोर 276 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र या थरारक सामना न्यूझीलंडने 5 विकेट्सने जिंकला.
5 सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली असली तरी द्रविडने यामध्ये सर्वाधिक 309 धावा केल्या होत्या.
4) विराट कोहली (123 धावा, नेपीयर, 2014)-
2014 च्या दौऱ्यीतील भारताचा न्यूझीलंड विरुद्धचा पहिलाच वन-डे सामना होता. तेव्हा विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करण्यामध्ये माहिर होण्यास सुरुवात झाली.
न्युझीलंडने दिलेल्या 293 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना विराटने त्याचे वन-डेतील 18वे शतक झळकावले. त्याने 11 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 111 चेंडूत 123 धावा केल्या होत्या. मात्र हा सामना भारताला 24 धावांनी गमवावा लागला.
5) क्रिस क्रेन (115 धावा, ख्राईस्टचर्च, 2009)-
न्यूझीलंडच्या क्रिस क्रेन या अष्टपैलू खेळाडूने भारताविरुद्ध पाचव्या वन-डे सामन्यात शतकी खेळी करत भारतासमोर मोठे लक्ष्य ठेवण्यास मदत केली होती.
त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 80 चेंडूत 7 षटकार आणि 7 चौकाराच्या मदतीने 115 धावा ठोकल्या. हा सामना भारताने 70 धावांनी गमावला होता. या सामन्यात भारताकडून अनिल कुंबळे यांना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगलेच धुतले होते. त्यांनी 10 षटकात 78 धावा देत एकच विकेट पटकावली होती.
क्रिसने 2000 विश्वचषकाच्या बाद फेरीत भारताविरुद्ध नाबाद 102 धावा केल्या होत्या. हा सामना न्यूझीलंडने 4 विकेट्सने जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
–एवढी चांगली कामगिरी केलेल्या एमएस धोनी चाहत्यांसाठी ही आहे निराशाजनक बातमी
–क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच झाले असे फोटोसेशन, जाणून घ्या कारण
–न्यूझीलंड-भारत वनडे मालिकेत विराट कोहलीला हा खेळाडू ठरू शकतो वरचढ