ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ आता 23 जानेवारीपासून न्यूझीलंड विरुद्ध 5 वन-डे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. नेपीयरमध्ये पहिला वन-डे सामना खेळला जाणार आहे.
आत्तापर्यंत भारताचा न्यूझीलंड दौरा काहीसा आव्हानात्मकच राहिला आहे. येथील मैदाने भारतासाठी नेहमीच कर्दनकाळ ठरली आहे.
1990-91च्या दरम्यान सात वेळेच्या प्रयत्नानंतर भारताला प्रथमच न्यूझीलंड भूमीत विजय मिळवता आला होता. कपिल देवच्या चेंडूवर डॅनी मॉरीसन त्रिफळाचीत झाल्याने भारताने तो सामना जिंकला होता. त्यानंतर मात्र न्यूझीलंडचे हवामान भारताला सामने जिंकण्यापासून रोखत होते.
1992च्या विश्वचषकामध्ये हॅम्लिटनला झालेल्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला 55 धावांनी पराभूत केले होते. तर वेलिंग्टन येथे झालेल्या सामन्यात विंडीजकडून 5 विकेट्सने आणि डुनेदीनमध्ये न्यूझीलंडकडून 4 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता.
मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 1993-94दरम्यान न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. यामध्ये भारताच्या पदरी निराशाच पडली होती. कसोटी आणि वन-डे दोन्ही मालिका अनिर्णीतच राहिल्या.
1998-99ला भारताला अझरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका गमवावी लागली तर वन-डे मालिका अनिर्णीत राखता आली होती.
2002-03ला भारतीय संघ सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. यामध्ये भारताच्या फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली असली तरीही भारताला कसोटी आणि वन-डे मालिका गमवावी लागली होती.
यावेळी भारताने 5 पैकी 2 वन-डे सामने जिंकले होते. या दोन्ही सामन्यात स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने शतकी खेळी केल्या होत्या. तर तो या दौऱ्यात वन-डेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2008-09मध्ये न्यूझीलंड दौऱ्यात गेला होता. यामध्ये भारताने टी20 मालिका गमावली होती. तर कसोटी आणि वन-डे मालिकेत विजय मिळवला होता.
2013-14च्या दौऱ्यात मात्र भारताला 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत 4-0 असा दारूण पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे या मालिकेत भारताला त्यांचे विक्रम सुधारण्याची संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–शतकी खेळी करणाऱ्या हशिम आमलावर स्वार्थी असल्याची टीका
–न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी
–टीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर