एशिया कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आज (23 सप्टेंबर) दुसरा सामना दुबईत होणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. भारताने पाकिस्तान आणि बांग्लादेशाविरूद्ध सफाईदार विजय मिळवले आहेत.
पाकिस्तानला खेळपट्यांचा चांगला अनुभव असून त्यांचे बहुतेक सामने युएईत होत असतात. त्यामुळे हा सामना जिंकत एशिया कपच्या अंतिम सामन्यासाठी आपली जागा पक्की करू इच्छितात.
मागीच्या सामन्यात भारताची कामगिरी अव्दितीय झाली होती. याही सामन्यात भारतीय संघ आपली लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. साखळी सामन्यांपेक्षा येथे परिस्थिती वेगळी आहे. पाकिस्तान आपल्या उत्कृष्ट आकडेवारीसह मैदानात उतरणार आहे.
तर पाहूयात आकडे काय म्हणतात ते.
1- सलामीचा फलंदाज इमाम-उल-हकने 50 पेक्षा जास्त धावा केलेले सर्वच सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.
2- बाबर आझम हा आपला 50 वा वनडे सामना खेळणार आहे.
3- रवींद्र जडेजाला भारताकडून एशिया कप स्पर्धेत सर्वात जास्त विकेट घेणारा फिरकी गोलंदाज होण्यासाठी एक विकेटची आवश्यकता आहे. हा विक्रम सध्या सचिन तेंडूलकरच्या नावावर(17) आहे. जडेजाने 16 विकेट घेतल्या आहेत. भारताकडून एशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स इरफान पठानने (२२) घेतल्या आहेत.
4-पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने 2018 मध्ये 8 सामन्यात फक्त 3 विकेट घेतल्या आहेत.
5- कुलदीप यादवचे 2018 मध्ये 17 वनडे सामन्यात 17.13 च्या सरासरीने 29 विकेट घेतल्या आहेत.
6-रोहीत शर्माला वनडेत 7000 धावा करण्यासाठी 94 धावांची गरज आहे. त्यानंतर तो अशी कामगिरी करणारा 9 भारतीय फलंदाज ठरणार आहे. तर सर्वात जलद 7000 धावा करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरेल.
7- धोनीला भारताकडून वनडे सामन्यात 10000 धावा करण्यासाठी 95 धांवाची आवश्यकता आहे. त्याने जर या सामन्यात 95 धावा केल्या तर तो असा पराक्रम करणारा भारताचा 4 था फलंदाज ठरेल.या आधी सचिन तेंडूलकर, राहूल द्रविड, सौरव गांगूली यांनी ही कामगिरी केली आहे.
8- युजवेंद्र चहलला आपले वनडेत 50 विकेट पुर्ण करण्यासाठी 2 विकेटची आवश्यकता आहे. त्यानंतर तो अशी कामगिरी करणारा 37 वा भारतीय गोलंदाज ठरेल तर 14 वा भारतीय फिरकी गोलंदाज ठरेल.
9- दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 212 आहे.
10- दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमवरील सर्वोच्च धावसंख्या इंग्लडच्या संघाने पाकिस्तानविरूद्ध 2015 मध्ये नोंदवली आहे. या सामन्यात इंग्लडने 5 विकेट गमावत 355 धावांचा डोंगर उभा केला होता.
11- या मैदानावरची निचांक्की 131 धावसंख्या श्रीलंका संघाने पाकिस्तानविरूद्ध नोंदवली होती.
12- या मैदानावर सर्वात मोठा विजय इंग्लडच्या संघाने 84 धावांनी पाकिस्तानवर मिळवला आहे.
13- सर्वात कमी 209 धावसंख्य़ेचा बचाव पाकिस्तानच्या संघाने दक्षिण अफ्रिकेविरूद्ध केला आहे.
14- या मैदानावरील सर्वोच्च 130 धावांची खेळी केवीन पीटरसनच्या नावावर आहे. त्याने 2012 मधे पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात केली होती.
15-एका डावात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीच्या नावावर आहे.त्याने अॉस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे सामन्यात 38 धावात 6 बळी मिळवले होते.
16- अंशुमान राठ आणि निजाकत खान या हॉंगकॉंग च्या खेळाडूंच्या नावावर पहिल्या गड्यासाठीची 174 धावांची सर्वात मोठी भागीदारी आहे.
महत्वाच्या बातम्या-
-एशिया कप २०१८: टीम इंडियासमोर अनपेक्षित पाकिस्तानचे कडवे आव्हान
-भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानच्या या खेळाडूला आयसीसीने सुनावली ही मोठी शिक्षा
-हिटमॅन रोहित शर्मा या कारणामुळे पाकिस्तान विरुद्ध ठरणार हिट