भारत आणि पाकिस्तान यांच्यात 19 सप्टेंबरला दुबई येथे होणाऱ्या एशिया चषकातील सामन्यापुर्वी अनेक चर्चा केल्या जातात. या दोन्ही देशांदरम्यान मागील काही दिवसात क्रिकेट सामने खुप कमी होत आहेत. त्याला राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. त्यामुळे हे संघ मोठ्या स्पर्धेतच एकमेकांना भीडतात.
दोन्ही संघ शेवटच्या वेळी इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या अंतिम लढतीस सामोरे आले होते. यात पाकिस्ताने भारताचा मोठा पराभव केला होता.
एशिया कपमध्ये भारतीय संघ हंगामी कर्णधार रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद असणार आहे.
एशिया कप स्पर्धेत दोन्ही संघ आता पर्यंत 12 वेळा आमने सामने आले आहेत. त्यात भारताने 6 वेळा बाजी मारली आहे. तर पाकिस्तानने 5 वेळा विजय नोंदवला आहे. त्यामुळे 6-6 अशी विजयाची बरोबरी करण्यासाठी पाकिस्तानला संधी आहे.
भारत हा एशिया कप स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असून 6 वेळा विजेता ठरला आहे. श्रीलंका 5 वेळा तर पाकिस्तानने 2 वेळा विजेतेपद मिळवले आहे.
एशिया कप स्पर्धेत विराट हा पाकिस्तान विरुध्द सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असून त्याने 255 धावा केल्या आहेत. एशिया कप स्पर्धेत भारताविरूध्द सर्वाधिक धावा करणारा खेळाडू शोएब मलिक असून त्याने 307 धावा केल्या आहेत. पाकिस्तानच्या सईद अजमलने एशिया कप स्पर्धेत भारताविरूध्दच्या 4 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशिया कप २०१८: भारत-पाकिस्तान सामन्यासाठी इम्रान खान लावणार हजेरी
–टॉप ५: शिखर धवनने दमदार शतक करत केले हे खास विक्रम
–टॉप ५: भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान या विक्रमांकडे असणार लक्ष