टी20 विश्वचषक 2024 मध्ये 9 जून रोजी भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्याची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. प्रत्येकाला या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. मात्र, या सामन्यापूर्वी एक वाईट बातमी आहे. या सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय येऊ शकतो आणि सामन्याची मजा खराब होऊ शकते.
टीम इंडियानं टी20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात शानदार केली. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघानं मोठा विजय मिळवला. तर दुसरीकडे पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात अमेरिकेविरुद्ध दारुण पराभवाला सामोरं जावं लागले. आता दोन्ही संघ 9 जूनला एकमेकांशी भिडणार आहेत.
मात्र, या सामन्यावर पावसाचं सावट आहे. AccuWeather नुसार, 9 जूनला 41 टक्के पाऊस अपेक्षित आहे. त्यानंतर तो 40 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. आता त्या दिवशी न्यूयॉर्कमध्ये पाऊस पडतो की नाही हे पाहायचं आहे.
टी20 विश्वचषक 2024 मध्ये साखळी सामन्यांसाठी राखीव दिवसाची कोणतीही तरतूद नाही. म्हणजे सामनाच्या दिवशी पाऊस पडला तर दुसऱ्या दिवशी खेळ होणार नाही. जर सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांनं 1-1 गुण वाटून दिले जातील. असं झाल्यास पाकिस्तानला नुकसान सहन करावं लागू शकते.
टी20 विश्वचषकात आतापर्यंत भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध पूर्णपणे वरचढ ठरला आहे. पाकिस्तानला टी20 विश्वचषकात आतापर्यंत फक्त एकदाच भारताचा पराभव करता आला आहे. 2021 च्या टी20 विश्वचषकात त्यांनी टीम इंडियाचा पराभव केला होता. अशा स्थितीत आता पुन्हा एकदा टीम इंडियाची नजर पाकिस्तानविरुद्धच्या विजयावर असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत पाकिस्तान सामन्यात टाॅस ठरणार निर्णायक! 2007 पासून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने गमावला आहे सामना
विश्वचषकातील सर्वात मोठ्या लढतीत भारत-पाकिस्तान आमनेसामने! कोणता संघ ठरेल वरचढ? संपूर्ण स्क्वॉड Analysis
कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विराटची बॅट तळपते, अशी आहे किंग कोहलीची पाकिस्तान विरुद्ध कामगिरी