टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. भारताने या स्पर्धेत पाच सामने खेळले आणि त्यातील तीन जिंकले. पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात भारताला तब्बल १० विकेट्सने पराभूत केले होते. चाहत्यांमध्ये या सामन्याविषयी खूपच उत्सुकता पाहायला मिळाली होती आणि तीच उत्सुकता आता जगासमोर आली आहे. स्टार इंडियाने याविषयी माहिती दिली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान हा टी२० विश्वचषकातील सामना २४ ऑक्टोबरला खेळला गेला होतो. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला होता. पाकिस्तानने या सामन्यात भारतावर त्यांचा विश्वचषकातील पहिला विजय मिळवला. या सामन्यात अनेक नवीन विक्रम नोंदवले गेले, पण आता एका खास विक्रमाची माहिती समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना आतापर्यंत सर्वाधिक पहिला गेलेला आंतरराष्ट्रीय टी२० सामना ठरला आहे.
स्टार स्पोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार हा सामना १६७ मिलियन (१६.७० करोड लोकांनी पहिला आहे) लोकांनी पहिला आहे. याचसोबत या सामन्याने हा विक्रम बनवला आहे.
यापूर्वी सर्वाधिक पहिला गेलेला आंतरराष्ट्रीय टी२० सामना, २०१६ मधील भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील उपांत्य सामना होता. या महत्त्वाचा सामना १३६ मिलियन लोकांनी पहिला होता. स्टार स्पोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला आतापर्यंत २३८ मिलियन लोकांनी पाहिले आहे. यामध्ये सुपर १२ आणि क्वालिफायर फेरीचे सामने सामील आहे.
या सामन्याविषयी माहिती देताना स्टार स्पोर्ट्सच्या प्रवक्त्याने त्याचे मत व्यक्त केले आहे. ते पीटीआय सोबत बोलताना म्हणाले की, भारत पाकिस्तान सामन्याने इतिहास रचला आहे. आम्ही सतत मोठ्या सामन्यासाठी क्रिकेट चाहात्यांची संख्या वाढवत आहोत. हे आमच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. या गोष्टीत कसलीच शंका नाही की, सामन्याचा निकाल आणि भारतीय संघ उपांत्य सामन्यात पोहोचली नसल्याने भारतीय चाहते निराश आहेत. पण व्हीवर्शिपचा विक्रम क्रिकेटचे महत्त्व दाखवतो, जे अभूतपूर्व पद्धतीने पुढे जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रहाणेला डावलून रोहितला मिळणार न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत नेतृत्वाची संधी? वाचा सविस्तर
भारत-न्यूझीलंड सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहायचा असेल, तर पाळावे लागतील ‘हे’ कठोर नियम