कॉमनवेल्थ गेम्सच्या २४ वर्षाच्या इतिहासात यंदा नवीन बदल पाहायला मिळणार आहेत. ९० वर्षांपेक्षाही अधिक काळाचा इतिहास असणाऱ्या या स्पर्धेत दुसऱ्यांदाच क्रिकेटचा समावेश केला आहे. याआधी १९९८च्या स्पर्धेत असे झाले होते. मात्र यंदा फक्त महिला क्रिकेटला प्राधान्य दिले आहे. सामने २०-२० षटकांचे खेळले जाणार आहेत. ही स्पर्धा २८ जुलैपासून ते ८ ऑगस्ट दरम्यान बर्मिंघममध्ये खेळली जाणार आहे. या स्पर्धेत ७२ देशांचे ४५०० खेळाडू सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेतील पहिला क्रिकेट सामना २९ जुलै रोजी खेळला जाणार आहे. तसेच या स्पर्धेतील क्रिकेटचे सर्व सामने एजबस्टन स्टेडियम येथे खेळले जाणार आहेत. क्रिकेटच्या सुवर्ण आणि कांस्य पदकांचे सामने ७ ऑगस्टला खेळले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) महिला संघ जाहीर केला आहे. भारताचा पहिला सामना २९ जुलैला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
यावेळी या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. यामुळे चाहत्यांना एक उत्तम सामना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तर स्म्रिती मंधाना संघाची उपकर्णधार आहे.
क्रिकेटचे ८ महिला संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यातील प्रत्येकी चार संघांचे दोन गट पाडण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. तसेच दोन्ही गटातील जे दोन संघ पहिल्या दोन स्थानावर असतील ते थेट उपांत्य फेरीत पोहोचणार आहेत. त्यानंतर विजेत्या संघांमध्ये सुवर्ण पदकासाठी अंतिम सामना खेळला जाणार आहे.
गट अ – भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस
गट ब – इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका
भारताचे कॉमनवेल्थ गेम्स २०२२ स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने-
२९ जुलै – भारत वि. ऑस्ट्रेलिया
३१ जुलै – भारत वि. पाकिस्तान
३ ऑगस्ट – भारत वि. बार्बाडोस
कॉमनवेल्थ गेम्स २०२२साठी भारतीय महिला संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रिती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, एस. मेघना, तानिया सपना भाटिया (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्स, राधा यादव, हरलीन देओल, स्नेह राणा.
पाकिस्तान महिला टीम: बिस्माह मरूफ (कप्तान), मुनीबा अली (यष्टीरक्षक), अनम अमीन, ऐमान अन्वर, डायना बेग, निदा दार, गुल फ़िरोज़ा, तुबा हसन, कायनात इम्तियाज़, सादिया इकब.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबरच्या शतकामुळे पाकिस्तानची समाधानकारक कामगिरी, नावावार केला खास विक्रम
हार्दिक द मॅचविनर: अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला भेदक गोलंदाजीने आणले ड्रायव्हिंग सीटवर
ENGvsIND : बुमराहची जागा घेणाऱ्या सिराजचा इंग्लंडला दणका, दोन धुरंधरांना शून्यावर धाडले तंबूत