Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हार्दिक द मॅचविनर: अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला भेदक गोलंदाजीने आणले ड्रायव्हिंग सीटवर

July 17, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
hardik bowling

Photo Courtesy: Twitter/BCCI


इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान मँचेस्टर येथे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने झटपट दोन बळी मिळवत भारताला झकास सुरुवात करून दिली. मात्र, त्यानंतर जेसन रॉय व बेन स्टोक्सने आक्रमक भागीदारी करत इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करून दिले. मात्र, हार्दिक पंड्याने पुन्हा एकदा आपण गोलंदाजीतही मॅचविनर असल्याचे सिद्ध केले.

इंग्लंडची खराब सुरुवात व पुनरागमन

या निर्णायक सामन्यात भारतीय संघाने दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली. त्याने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो व जो रूट या दोघांनाही खातेही न खोलता तंबूत पाठवले. त्यानंतर दुसरा सलामीवीर जेसन रॉय व बेन स्टोक्स यांनी प्रतिआक्रमण करत वेगवान ५४ धावांची भागीदारी करत इंग्लंडला ९ षटकात २ बाद ६६ पर्यंत नेले.

The sprint and the catch, Ben Stokes is caught and bowled by @hardikpandya7 as England lose their fourth.

Live – https://t.co/qaVcGcMElB #ENGvIND pic.twitter.com/9hq3VPsfWi

— BCCI (@BCCI) July 17, 2022

 

हार्दिकने दिले दोन धक्के

पावर प्लेच्या शेवटच्या षटकात भारतीय कर्णधार रोहित शर्माने अष्टपैलू हार्दिक पंड्याला गोलंदाजासाठी पाचारण केल. हार्दिकने दुसऱ्या सामन्यात आपल्या पहिल्या षटकातच बळी मिळवलेला. अगदी तशीच गोलंदाजी त्याने या सामन्यातील आपल्या पहिल्या षटकात केली. अप्रतिम खेळत असलेल्या जेसन रॉयला आखूड टप्प्याच्या चेंडूवर फसवले. त्याने रॉयला यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हाती झेल द्यायला भाग पाडले. त्याने आपले पहिले षटक निर्धाव टाकले. त्यानंतर तो आपल्यात तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा  गोलंदाजीसाठी आला. या षटकात त्याने जम बसलेला दुसरा फलंदाज बेन स्टोक्सला फसवले. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू टाकत ‌‌त्याने स्वतःच्याच गोलंदाजीवर स्टोक्सचा झेल घेतला. त्यामुळे इंग्लंडची अवस्था ४ बाद ७४ अशी झाली.

महत्त्वाच्या बातम्या-

तब्बल ९७ वर्षानंतर कसोटीमध्ये झाली पुनरावृत्ती, श्रीलंकेच्या गोलंदाजाचा धूमाकुळ कायम 

शेवटच्या निर्णायक वनडे सामन्यात नशीब भारताच्या बाजूने, नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय 

भारताचा ‘सूर्या’उदय होण्यात कॅप्टन रोहित शर्माचा मोठा हात 


Next Post
babar-azam

बाबरच्या शतकामुळे पाकिस्तानची समाधानकारक कामगिरी, नावावार केला खास विक्रम

ndian-Women-Cricket

भारत-पाकिस्तान ३१ जुलैला येणार आमने-सामने, वाचा कधी आणि कुठे रंगणार सामना

sri-lanka-fans

श्रीलंकन चाहत्यांसाठी वाईट बातमी, आता 'या' देशात पार पडू शकतो आशिया चषक २०२२

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143